बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Dhananjay Munde On Sharad Pawar | राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांना सोबत घेऊन महायुतीबरोबर (Mahayuti) सत्तेत सहभागी झाले. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठे यश मिळाले तर महायुतीला मोठा फटका बसला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची अवघी एक जागा निवडून आली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे १० पैकी ८ खासदार निवडून आले.
त्यानंतर आता आगामी विधानसभेसाठी (Maharashtra Assembly Election 2024) सोडून गेलेल्या आमदारांच्या संदर्भाने पवारांनी रणनीती आखली आहे. आमदार धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात शरद पवार विशेष लक्ष घालत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यावरून धनंजय मुंडे यांनी नाव न घेता शरद पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, ” मुझे गिराने के लिए कई बडे लोग बार बार गिरे. मगर ये मुमकिन नही है. मला इथेच बांधून ठेवणं, मला टार्गेट करणे हे आजचं नाही. अनेक जणांनी हा प्रयत्न केला आहे. वाईट एका गोष्टीचं वाटतं ज्या नेत्यांचा आम्ही आजही आदर करतो. त्या नेत्यांना ही पातळी गाठली आहे”, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
ते पुढे म्हणाले, आम्ही ज्यांचा आजही आदर करतो, त्यांना आदरयुक्त बोलतो. भलेही आम्ही दादांसोबत राहिलो, परंतु कधीही व्यक्तीगत टीका आम्ही त्यांच्यावर केली नाही. मात्र माझे घर, माझी जात यावर एवढ्या मोठ्या नेत्याला टीका करावी लागते.(Dhananjay Munde On Sharad Pawar)
मात्र परळी वैजनाथ मतदारसंघातील मायबाप जनता अतिशय हुशार आहे, सुज्ञ आहे. त्यांना माहीत असतं की आपल्या माणसाला का टार्गेट केले जात आहे. कुणी टार्गेट करायचा प्रयत्न केला तर त्यांचे टार्गेट कसा हाणून पाडायचं हे सुद्धा परळीकरांना फार चांगलं माहीत आहे, असे म्हणत त्यांनी शरद पवारांना इशाराच दिला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
Pune Crime Branch News | खंडणीच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार आरोपी जेरबंद