परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – Dhananjay Munde On Sharad Pawar | शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. भाजप नेते समरजितसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला.
त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पवारांनी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर, महायुती सरकारच्या (Mahayuti Govt) धोरणावर टीका करताना, राज्यातील हे सरकार घालवायला पाहिजे, असे म्हणत शरद पवारांनी राज्य सरकारवर टीका केली.
राज्याचे कृषिमंत्री आणि कधीकाळी शरद पवारांचे विश्वासू साथीदार असलेल्या धनंजय मुंडेंना परभणी दौऱ्यात यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावर, बोलताना त्यांनी शरद पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ देणारे सरकार घालवायचे आहे का, असा सवाल धनंजय मुंडेंनी विचारला.
मुंडे म्हणाले, ” सरकार राज्यातील साडेबारा कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ मिळवून देत आहे.
महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, किंवा शेतकऱ्यांचा पिक विमा असेल, शेतकऱ्यांना दरमहा नमो शेतकरी योजना असेल, तसेच वेगवेगळ्या घटकांसाठी राज्य सरकार प्रत्यक्ष लाभाच्या योजना राबवत आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील जनता खुश आहे, अशा चांगल्या योजना राबवणाऱ्या सरकारला का घालवायचे आहे”, असा सवालच धनंजय मुंडे यांनी शरद पवारांना विचारला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | दिव्यांग आयुक्त असल्याचे भासवून दिव्यांगाला 39 लाखांना गंडा