Dhananjay Munde | ‘भाऊ असे पर्यंत बहिणीचा चेक बाऊन्स होणार नाही…’; धनंजय मुंडेंचे पंकजाताईंना आश्वासन

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Dhananjay Munde | स्केटबोर्ड क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक (Skateboard Sports Gold Medal) मिळवणाऱ्या श्रद्धा गायकवाडचा (Shraddha Gaikawad) परळी (Parali) येथे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे नेते धनंजय मुंडें (Dhananjay Munde) उपस्थित होते. या दरम्यान त्यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली. यावेळी भाषण करत असताना पंकजा मुंडे म्हणाले, ‘श्रद्धा तुला गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) प्रतिष्ठानाकडून ब्लँक चेक देत आहे. जेवढी रक्कम तुला हवी आहे, तेवढी तू टाक फक्त चेक बाउन्स झाला नाही पाहिजे, एवढी रक्कम टाक.’

त्यावेळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, ‘पंकजाताईंनी आता श्रद्धाला चेक दिला आहे.’ एवढं म्हणताच पंकजा मुंडेंनी ‘त्यात पैसे टाका’ असे म्हणाल्या. त्यामुळे सभागृहात एकच हश्शा पिकली. त्याला लगेच धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले आणि म्हणाले, ‘जरी त्या अकाउंट मधील पैसे कमी पडले, तर मी टाकेल. अजून ही टाकत आहे. बहिणीने चेक दिला असला तरी भाऊ तो बाऊन्स होऊ देणार नाही, काळजी करू नको.’ धनंजय मुंडे असे म्हणताच सभागृहात अजूनच हश्शा पिकली.

राष्ट्रवादीचे (NCP) आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे
(Pankaja Munde) यांच्यातला राजकीय संघर्ष अवघ्या महाराष्ट्र जाणतो.
पण, परळीमध्ये श्रद्धा गायकवाडचा सत्कार करण्यासाठी एका कार्यक्रमात दोघेही भाऊ-बहिण एकत्र आले.
श्रद्धा गायकवाडने गुजरात येथे आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले असून ती ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेणार आहे.

Web Title :-  Dhananjay Munde | pankaja munde and dhananjay munde at the event in beeds parli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update