राष्ट्रवादीतल्या ‘बबन्या’चा भाजपात गेल्यावर ‘बबनराव’ कसा होतो : धनंजय मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक दिग्गज नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून आत्तापासूनच त्यांनी सत्ताधारी पक्षावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रादरम्यान विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपावर सडकू टीका केली आहे. ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते हे भाजपासाठी बबन्या होते. आता भाजपामध्ये गेल्यानंतर ते बबनराव कसे झाले असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी यात्रा सुरु केल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादीने देखील शिवस्वराज्य यात्रा सुरु केली आहे. आज जिंतूर येथे असलेल्या याच यात्रेतून मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादीमध्ये असलेले बबनराव पाचपुते हे त्यावेळी मंत्री होते. मंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यावेळी ते तुमच्यासाठी बबन्या होते. मात्र, आता भाजपामध्ये येताच ते बबनराव झाले असा खोचक टोला त्यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी केलेले आरोप फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी होते. नाहीतर भाजप पक्षात भ्रष्टाचारी आहे हे फडणवीस यांनी मान्य करायला पाहिजे, असे मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ते भाजपामध्ये जाताच कसे पवित्र होतात असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like