सरकार काय पंतजली आणि रिलायन्स च्या दूध पुरवठ्याची वाट पाहते आहे ? : धनंजय मुंढे 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन 
स्वभिमानी शेतकरी संघटनेने दूध बंद आंदोलन केले आहे. या आंदोलनाचे पडसाद आज विधान परिषदेत देखील उमटले. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दूध आंदोलनावरून सरकारला धारेवर धरले. यावेळी ते म्हणाले “राज्यातील शेतकरी दुधासाठी आंदोलन करीत आहेत पण सरकार ठोस पावले उचलत नाही . हे सरकार काय रिलायन्स आणि पतंजली कडून दूध पुरवठा होण्याची वाट पाहताय का? असा सवाल धनंजय मुंढे यांनी केला . याबरोबरच परराज्यातून येणाऱ्या दुधावर करलागू करण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
[amazon_link asins=’B01F7AX9ZA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’281e680a-898f-11e8-a603-dd59f5934668′]
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, स्वभिमानी शेतकरी संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. ज्याचे चांगलेच  पडसाद आज विधानपरिषदेत उमटले. यावेळी बोलताना विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे चांगलेच आक्रमक झाले . ते म्हणाले ,”दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी मंत्री प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. तर घोडं कुठं पेंड खातंय? त्यांना अनुदान का दिलं जात नाही? गायीच्या दुधाला २७ रुपये दरही मिळत नाही. त्यामुळे हतबल शेतकरी सरकारकडे आशेने पाहतोय,’ असं सांगतानाच ‘शेतकऱ्यांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी उद्या रिलायन्सचं दूध येईल. बाबा रामदेव यांच्या पतंजलीचं दूध येईल, असं सरकारला वाटतंय. तर त्यांनी त्याची वाट पाहू नये. लवकरात लवकर शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा,’ असे मुंडे म्हणाले. सध्याचा दुधाचा दर पाहता शेतकऱ्याना दूध विक्रीत प्रतिलिटरमागे १० रुपयांचे नुकसान होत असल्याचे देखील मुंढे यांनी निदर्शनास आणून दिले.