Dhananjay Munde | ‘अजित पवारच सरकारला शिस्तीत आणू शकतात’, पक्षाच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंची फटकेबाजी (व्हिडिओ)

0
488
Dhananjay Munde | shinde fadnavis government only scared of ajit pawar dhananjay munde statement in beed ncp program
file photo

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महत्त्वाचा प्रकल्प गुजरातला नेण्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) विरोधक टीका करत आहेत. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आक्रमक झाला असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निदर्शने केली जात आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री (Guardian Minister) नेमला नसल्यावरुन सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कामाचे कौतुक केलं. बीडमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) बोलत होते.

अजित पवारांनी केलेल्या कामाचे कौतुक करताना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, अजित पवार यांचे पहिल्यापासून मराठवाड्यावर (Marathwada) प्रेम आहे. ते जलसंपदा मंत्री आणि उपमुख्यमंत्री असातना मराठवाड्याच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. बीड जिल्ह्यात शेतीचं उत्पन्न वाढवणारा निर्णयही अजित पवारांनी घेतला. कोरोना (Corona) काळात कुणी-कुणाला घरात घेत नव्हतं. मुंबईमध्ये आपला सख्खा भाऊ काम करत असला, तर त्याला परत गावात देखील घेतलं जात नव्हतं. तो काळ एवढा वाईट होता. कोविडनं माणसं मरायच्या आधी माणसांमधील माणुसकी मारली, सख्ख्या भावाला, नातेवाईकांना घरात येऊ दिले नाही.

मुंडे पुढे म्हणाले, कोविड काळात सामान्य माणूस माणुसकी विसरला होता. पण राजकारणी म्हणून अजित पवारांनी माणुसकी कशी जिवंत ठेवली, आपण सर्वांनी पाहिलं. ते सकाळी सात वाजल्यापासून मंत्रालयात (Mantralaya Mumbai) उपमुख्यमंत्री म्हणून राज्याकडे लक्ष देत होते. कोरोना काळात माणुसकी जिवंत ठेवायचं काम अजित पवारांनी केलं.

आज प्रसंग वेगळा असून आम्ही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहोत.
हे सरकार सत्तेवर कसं आलंय? हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून बेशिस्तपणे वागत आहे.
ते केवळ विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवारांना घाबरतात.
समोरचे कितीही मातबर राजकारणी असू द्या, सरकार बेशिस्तीत वागायला लागतं, तेव्हा विरोधी पक्षनेते म्हणून
अजित पवारच सरकारला शिस्तीत आणू शकतात, अशा शब्दात मुंडे यांनी फटकेबाजी केली.

यावेळी बोलताना मुंडे यांनी भाजप (BJP) सरकारवर हल्लाबोल केला.
120 आमदार असूनही उपमुख्यमंत्रीपदावर भाजपला समाधान मानावं लागत आहे.
मग महाविकास आघाडी पाडुन नवं सरकार आणून भाजपला काय फायदा झाला अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला.

Web Title :- Dhananjay Munde | shinde fadnavis government only scared of ajit pawar dhananjay munde statement in beed ncp program