‘आता काय ! सत्ता टिकली तर टिकली नाही तर हुकली’ : धनंजय मुंडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशात सध्या लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापले आहे. त्यात सोशलमीडियामध्ये या निवडणूकिचे अनेक किस्से व्हायरल होतांना दिसत आहेत. त्यामध्ये सध्या मोदींचे चित्र असलेली टिकली खुप फेमस होत आहे. त्याचे फोटोही व्हायरल झाले होते. त्याचाच संदर्भ घेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजप तसेच मोदींना लक्ष करत, ‘आता काय! सत्ता टिकली तर टिकली नाही तर हुकली’ म्हणत ट्विटरवरून भाजपला चिमटा काढला आहे.

लोकसभा निवडणूकीसाठी ११ एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. निवडणूकीचा प्रचार सुरू झाला असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळी शक्कल लढवली जात आहे. भाजप त्यात आघाडीवर असल्याचं दिसत आहे. त्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. साडी, टी-शर्टपासून ते चहाच्या कपवरही मोदींचे छायाचित्र वापरले जात आहे. त्यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याच्या तक्रारीही दिल्या आहेत. त्यातच आता नव्याने बाजारात मोदींचे छायाचित्र असलेली ‘टिकली’ आली आहे. या पाकिटावर एकीकडे नरेंद्र मोदींचा फोटो आहे, तर दुसरीकडे भाजपाचं निवडणूक चिन्ह छापण्यात आलं आहे.

https://twitter.com/dhananjay_munde/status/1111867635598135296

या टिकलीच्या पाकीटाचा फोटो शेअर करत विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी हे ट्विट केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ‘अरे देवा… यांनी तर आता टिकली पण प्रचाराचं लेबल लावून विकली…’आता काय ! सत्ता टिकली तर टिकली नाही तर हुकली’