Dhananjay Munde | पंकजा मुंडे यांच्याबाबत धनंजय मुंडे म्हणाले – आमच्यात भाऊ-बहिणीचे नाते राहिले नाही, राजकारणात एकमेकांचे…

औरंगाबाद : Dhananjay Munde | आमच्यात भाऊ-बहिणीचे नाते राहिले नाही. आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत. नातेसंबंध हे अगोदर होते. राजकारणामुळे वैर निर्माण झाले, असे राष्ट्रवादीचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबाबत बोलताना म्हटले आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहिण-भावामधील राजकीय वैर जगजाहीर आहे, पण आता भाऊ-बहिणीचे नातेही तुटले असल्याचे सांगत राजकीय वैर किती टोकला पोहचले आहे हेच मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, कुणाच्या वक्तव्यामुळे, वागण्यामुळे काय परिणाम होतात हे ज्याने त्याने आत्मपरिक्षण करावे. वारंवार अशाप्रकारची वक्तव्ये येतात ते बरोबर की चुकीचे त्याबाबत आकलन करून करावे. ही राजकीय विधाने आहेत. काय बोलायचे हे त्यांनी ठरवावे.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, भगवान गडाच्या (Bhagwan Gad) दसर्‍याची परंपरा ही संतश्रेष्ठ भगवानबाबांनी सुरू केली. दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) असेपर्यंत ही परंपरा सुरू होती. आता कुणी मेळाव्याला जायचे कुणाला बोलवायचे, दसरा मेळाव्याला केंद्रीय मंत्र्याला आमंत्रण का दिले नाही ते त्यांनाच विचारा. आम्ही भाऊ-बहीण म्हणून राजकीय विरोधक आहोत. आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांबद्दल काय बोलावे हे ज्याने त्याने ठरवावे. त्याबाबत सांगण्यासाठी मी लहान आहे.

बीडमध्ये बोलताना पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल एक वक्तव्य केले होते.
मात्र, नंतर आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेल्याचे त्यांनी म्हटले होते.
मी जनतेच्या मनात असेन तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदीही हरवू शकत नाहीत, असे पंकजा मुंडेंनी म्हटले होते.
यावर बोलताना धनंजय मुंडे यांनी, आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांबद्दल काय बोलावे हे ज्याने त्याने ठरवावे.
मी त्याबाबत सांगण्यासाठी लहान आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

Web Title :- Dhananjay Munde | we no longer have a brother sister relationship dhananjay mundes statement regarding pankaja munde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Politics | NCP च्या महिला नेत्याचा BJP मध्ये प्रवेश, बारामतीमध्येच शरद पवारांना मोठा धक्का!

RBI Hike Repo Rate | सणासुदीपूर्वी RBI चा पुन्हा झटका, रेपो रेट 0.50 टक्के वाढला, कर्ज महागले