Dhananjay Munde | धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणारी रेणू शर्मा कोण ? ‘5 कोटी रूपये आणि एक दुकान द्या नाहीतर…’;

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dhananjay Munde | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेने मागील वर्षी बलात्काराचा (Rape Case) आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यावेळी विरोधी पक्षाने धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) राजीनाम्याची मागणी केली होती. अशातच आता पुन्हा एकदा रेणू शर्माने धनंजय मुंडे यांना पाच कोटी आणि पाच कोटींच्या दुकानाची मागणी (Ransom) केली त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पोलिसांकडे याबाबत खंडणीची तक्रार (Extortion Case) दाखल केली आहे. याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने (Mumbai Police Crime Branch) इंदौर पोलिसांनी (Indore Police) संयुक्त कारवाई करत त्या महिलेला अटक करण्यात आली आहे. यावर धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

गेल्या दीड – दोन वर्षांपासून हा त्रास होत असून त्यांनी खोटी तक्रार (False Complaint) माझ्या विरोधात केली ती तक्रार परत वापस घेतली. काही दिवसांपासून त्रास होतोय, तो सहन करत होतो अखेर शेवटी सहनशीलता संपली आणि मला पोलिसांमध्ये तक्रार द्यावी लागली असल्याचं धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटलं आहे.

 

मागील वर्षी मजाक मध्ये एक कागद पोलिसात दिला तर तुमचे मंत्री पद धोक्यात आले होते,
आता पुन्हा तीच माझ्यावर बलात्कार (Rape) झाला असल्याची तक्रार करून सोशल मीडियावरून बदनामी करून तुमचे मंत्रीपद घालवेन, असे होऊ द्यायचे नसेल तर मला 5 कोटी कॅश आणि 5 कोटींचे दुकान घेऊन द्या,
अशा प्रकारे ब्लॅकमेल (Blackmail) करत खंडणी संबंधित महिलेने मागितली.
यानंतर धनंजय मुंडे यांनी मुंबई क्राईम ब्रँचकडे पुराव्यांसह तक्रार दिली आहे.

रेणू शर्मा या महिलेने मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप करत खळबळ माजवली होती.
त्यानंतर काही दिवसातच तिने सदर तक्रार माघारी घेतली होती.
तेव्हापासून रेणू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हाट्सॲप तसेच फोन करून पैशांची मागणी करत होती,
यासंदर्भातील सर्व पुरावे धनंजय मुंडे यांनी पोलिसात दिले असल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

 

‘पिछले साल एक कागज सोशल मीडिया पर डाला तो तुम्हारा मंत्री पद जानेकीं नौबत आ गई थी।
अब अगर मेरी मांग पूरी नहीं की तो बदनाम कर दुँगी। अगर मंत्री पद बचाना चाहते हो, तो दस करोड कौनसी बडी बात है ?’
अशा आशयाचे मेसेज सदर महिला पाठवत असून,
याद्वारे 5 कोटी रुपये कॅश आणि 5 कोटी रुपयांचे दुकान विकत घेऊन देण्याची मागणी रेणू शर्माने केली असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
रेणू शर्मावर अनेक व्यक्तींनीही ब्लॅकमेल संदर्भातल्या तक्रारी यापुर्वी अनेकदा विविध पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत.

 

Web Title :- Dhananjay Munde | Who is Renu Sharma who blackmailed NCP leader and minister Dhananjay Munde Give 5 crore rupees and a shop otherwise

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा