परळीमधून मोठ्या मताधिक्याने धंनजय मुंडे विजयी

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – परळीमध्ये झालेल्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा 30 हजार मतांनी पराभव करत विजय साजरा केला. भाजपच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांनी या मतदारसंघातून दोन वेळा विजय मिळवला होता. मात्र यावेळी धंनजय यांनी जोर लावत पंकजा मुंडे यांचा दणदणीत पराभव केला.

पंकजा मुंडे यांना 65 हजार मतदान झाले असून धनंजय मुंडे याना 95 हजार मतदान झाले. यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी केलेलं विधान आणि त्यावरुन रंगलेलं अश्रूंचं राजकारण यामुळे हि निवडणूक अतिशय रंगतदार ठरली होती. प्रचारामध्ये देखील दोघे बहीण भाऊ आपणच विजयी होणार अशी शक्यता वर्तवत होते. मात्र अखेर धंनजय मुंडे यांनी यामध्ये बाजी मारली. त्यामुळे अनेक दिवसांपासून पंकजा यांचे असलेले वर्चस्व मोडून काढत अखेर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या गडाला सुरुंग लावला आहे.

Visit : Policenama.com