धनंजय मुंडेंनी केली वचनपूर्ती; २५५ अपंगांच्या खात्यात प्रत्येकी हजार रुपये जमा-डॉ. संतोष मुंडे

बीड: पोलीसनामा ऑनलाईन
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अपंग व्यक्तींना सर्वोतोपरी मदत करण्याचे वचन दिले होते. त्या वचनाची पूर्ती मुंडे यांनी पहिल्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थेतील ३ टक्के निधीतून २५५ अपंगांच्या खात्यात नगर पालिकेमार्फत प्रत्येकी हजार रुपये जमा करून केली असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडेंनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपंग कल्याण निधी देणे आवश्यक असते पण सर्वसाधारणपणे असे होताना दिसत नाही. मात्र, परळी वैजनाथ नगर परिषद यांस अपवाद ठरली आहे. अपंगांना निधी वितरीत करणारी पहिली नगर परिषद झाली आहे. धनंजय मुंडे यांनी नगर परिषदेस निर्देश दिले आणि त्यानुसार अपंगांच्या खात्यात प्रत्येकी हजार रुपये वर्ग झाले आहेत. या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी नगराध्यक्षा सरोजिनी हालगे, गटनेते वाल्मिक कराड, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक चंदूलाल बियाणी, मुख्याधिकारी डाँ.बाबुराव बिक्कड यांच्यासह आदी मान्यवरांनी विशेष प्रयत्न केले.

दरम्यान, साजन लोहिया, सय्यद सुभान, शेख फेरोज, शेख कादर,अनंतराव लोखडे, दशरथ सुत्रावे, अनंत बापु मुंडे, उध्दव फड, माणिक जाधव, संतोष आघाव,  संजय नखाते, संदेश कापसे, नागरगोजे आशा, सरताज खान, शेख रहिम, आसेफ खान, निलाबाई भद्रे, पुष्पा कांबळे, नंदकुमार जोशी, प्रदिप भोकरे, शेख.सिंकदर, मनोज नाथानी, राम वलवार, विमर धुमाळ, अरिहंत लोढा, विमल निलंगे, दत्ता काटे, अविनाश फड, शेख मिया, संतोष बल्लाळ, अभिजीत जगतकर, चंद्रकात होलबोले, ममता बद्दर, महादेव राऊत, बालाजी शहाणे,प्रमोद आबाळे , कपिल जाजू, तुळशिराम प्रयाग, अपंग, विधवा आणि माजी सैनिक संघटनेने धनंजय मुंडेंसह सर्व मान्यवरांचे आभार मानल्याची माहिती डॉ.संतोष मुंडेंनी दिली.