‘मोदीला उरावर घेतलं’ ; धनंजय मुंडे यांचीही जीभ घसरली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – साठ रुपयांची डाळ १२० रुपयांवर गेली. पावणेचारशे रुपयांचे सिलेंडर एक हजार रुपयांपर्यंत गेला. मोदींनी महागीई थांबविण्याचे स्वप्न दाखवले होते. त्याच मोदींनी प्रत्येकी किती लूट केली याचा विचार करा. तुम्हाला लुटल्याचे तुम्हाला कळूनसुद्धा दिले नाही. सपनो के सौदागर ने सपना दिखाया. आपण स्वप्नात रंगून गेलो. महागाई नसताना महागाई समजली आणि मोदीला उरावर घेतलं, असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. ते अहमदनगर येथे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

पाच वर्षांपूर्वी एखादा मोटारसायकलवाला पन्नास रुपये लिटर भावाप्रमाणे पेट्रोल भरत होता. आणि आज तोच भाव ८१ रुपये आहे. याचा अर्थ मोदी साहेबांनी मोटारसायकलवाल्यांची दिवसाढवळ्या ३१ रुपयांची लूट केली आहे. पावणे चारशे रुपयांना मिळणारा सिलेंडर एक हजार रुपये झाला. सिलेंडरच्या माध्यमातून दिवसाला सहाशे रुपयांची लूट तुमच्या घरातून केली.

मै हर साल दो करोड रोजगार निर्माण करुंगा. तरुणांना वाटले, भला माणूस देशाचा प्रधानमंत्री होतोय, वर्षाला दोन कोटी नोकऱ्या मिळणार आहेत. दोन कोटीतील एक नोकरी मला मिळणार आहे, आणि नोकरीचा प्रश्न सुटला की छोकरीचा प्रश्न संपणार आहे. छोकरीचा प्रश्न सुटला की घरात हम दो हमारे दो. माझ्या घरात अच्छे दिन येणार आहेत. तिच तरुणाई पाच वर्षानंतर आता समोर दिसायला लागली असल्याचे मुंडे म्हणाले.