तेरे रंग में घुल-मील गये इस कदर : धनंजय मुंडे

धनंजय मुंडे यांचा युतीला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई येथील झालेल्या पूल दुर्घटनेनंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. वारंवार होणाऱ्या पूल दुर्घटनानंतर सरकारची मती ठिकाणावर आली आहे की नाही ? गेली तीन वर्षे झोपा काढल्या का ? असा सवाल त्यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे. एवढेच नाही तर उद्धव ठाकरे युतीच्या प्रेमात इतके बुडाले आहेत की त्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. असा टोला त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. एकापेक्षा जास्त ट्विट करीत त्यांनी मुबईतील पूल दुर्घटनेबाबत जळजळीत भाष्य केले आहे.

तेरे रंग में घुल-मील गये इस कदर !
धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘उद्धव ठाकरे युतीच्या प्रेमात इतके बुडाले आहेत की जनतेप्रती त्यांच्या संवेदना बोथट झाल्यात. हाकेच्या अंतरावर असलेल्या दुर्घटनास्थळास न भेटता, ते युतीच्या मेळाव्यासाठी अमरावतीत गेले. पूल दुर्घटनेचा साधा उल्लेखही केला नाही. ६ जीवांची किंमत कळते का? असा सवाल मुंडे यांनी आपल्या ट्विट मधून केला आहे.

मुंबईकरांच्या भावनांचा, संयमाचा पूल आता पार तुटला आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “मुंबईत वारंवार होत असलेल्या पूल दुर्घटनेनंतरही सरकारची मती अजून ठिकाणावर आलेली नाही. संध्याकाळपर्यंत जबाबदारी निश्चित करू असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. अहो, गेले ३ वर्ष झोपा काढल्या का? लोकांच्या जीवाची किंमत पैशात तोलू नका. मुंबईकरांच्या भावनांचा, संयमाचा पूल आता पार तुटला आहे.

मुंबईतील पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची लायकी कळते
मुंबईतील पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची लायकी कालच्या दुर्घटनेमुळे कळते. मनपातील भाजपाचे सदस्य फक्त टक्केवारी खायला, भूखंडाचे आरक्षण घ्यायला आहेत का? मुख्यमंत्र्यांचा इंटरेस्ट फक्त DP पुरताच आहे का? या घटनेला शिवसेनचे सत्ताधारी, भाजपाचे पहारेकरी जबाबदार आहेत. #MumbaiBridgCollapse