भिडेंची पिलावळ आवरा, अन्यथा महाराष्ट्र पेटेल : धनंजय मुंडे

 मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – मुख्यमंत्री महोदय आपल्या राज्यात हे काय चालले आहे? मनोहर भिडे आणि त्यांची पिलावळ पुरोगामी विचारांच्या प्रत्येकाचा पानसरे दाभोळकर करायला निघाली आहेत, अशी संतप्त सवाल विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ट्वीटरवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जिवे मारण्याची धमकी असलेले पत्र मिळाल्यानंतर त्यांनी आपली सतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना रविवारी जिवे मारण्याची धमकी असलेले एक पत्र मिळाले. मनोहर भिडे आणि मनुस्मृती विरोधात बोलाल तर, तुमचाही दाभोळकर आणि पानसरे करु, अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. यावर धनंजय मुंडे यांनी ही संतप्त प्रतिक्रिया ट्वीटरवरून व्यक्त केली. शिवाय भुजबळांना आलेले पत्रही त्यांनी पोस्ट केले आहे.

ट्वीटरवरील आपल्या संतप्त प्रतिक्रियेत मुंडे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री महोदय, राज्यात हे काय चालले आहे? मनोहर भिडे आणि त्याची पिलावळ पुरोगामी विचारांच्या प्रत्येकाचा पानसरे, दाभोलकर करायला निघाली आहे. छगन भुजबळ साहेबांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल , या पिलावळीला वेळीच आवर घाला, असा इशाराही मुंडेनी आपल्या ट्वीट करून दिला आहे. भुजबळांना आलेल्या धमकीपत्रानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीमधून या प्रकारानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

शरद पवार-भास्कर जाधव भेटीची चर्चा
रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य मोहोत्सवाच्या निमित्ताने पवार हे चिपळूणमध्ये आले असताना त्यांनी जाधव यांची भेट घेतली.
आमदार भास्कर जाधव यांच्या पायावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या सुवर्ण-भास्कर या निवासस्थानी नेत्यांची रांग लावली होती. शिवसेनेच्या नेत्यांनी जाधव यांची भेट घेतल्याने जाधव हे राष्ट्रवादी सोडणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे शरद पवार यांनी जाधव यांना भेटून प्रकृतीची चौकशी केली, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.