भाजपा महिला नेत्याने केली आत्महत्या, हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान झाला मृत्यू

धनबाद : झारखंडनंतर धनबादमध्ये जिल्हा भाजपा स्वच्छता सेलच्या मीडिया प्रभारी संयुक्ता मुखर्जी यांचा हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागच्या मंगळवारी त्यांनी तेलीपाडा येतील आपल्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर कुटुंबियांनी त्यांना तातडीने हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते, जेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

विषारी पदार्थ पिऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. मागच्या मंगळवारी त्यांना अत्यावस्थ स्थितीत पीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले होते. येथे उपचार सुरू असताना मंगळवार-बुधवारच्या रात्री दिडवाजता त्यांचा मृत्यू झाला. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

मृत संयुक्ता मुखर्जी यांचे पती संजय मुखर्जी घरीच प्रींटिंग प्रेस चालवतात. आत्महत्येचे कारण कौटुंबिक वाद असल्याचे सांगितले जात आहे. त्यांचे माहेर हीरापुर झरनापाडामध्ये आहे. मृत संयुक्ता मुखर्जी यांचे वडील रवि मुखर्जी यांनी सांगितले की, सकाळी त्या आपल्या सासरी बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या. त्यांना उलट्या होत होत्या. त्यांनी संजय यांच्याशी दुसरा विवाह केला होता. पहिल्या विवाहातून त्यांना एक मुलगी आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like