Indian Railways : 30 सप्टेंबरपर्यंत ट्रेन रद्द केल्याची बातमी Fake असल्याचं रेल्वेनं सांगितलं, जाणून घ्या मंत्रालयानं दिलेली माहिती

धनबाद : वृत्तसंस्था – देशभरात नियमित ट्रेन 30 सप्टेंबरपर्यंत रद्द केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते, हे वृत्त बनावट असल्याचे रेल्वेने जाहिर केले आहे. ट्रेन रद्द करण्यासंबंधीचा रेल्वे मंत्रालयाचा बनावट आदेश सोमवारी सोशल मीडियावर वायरल झाला. हा आदेश पूर्व मध्य रेल्वेच्या धनबाद रेल्वे मंडळ व्यवस्थापनाकडे सुद्धा पोहचला. रेल्वे मंत्रालयाने ट्विट करून हा आदेश बनावट असल्याचे म्हटले.

आणखी 90 स्पेशल ट्रेन सुरू करण्यावर शिक्कामोर्तब नाही
12 ऑगस्टनंतर आणखी 90 स्पेशल ट्रेन सुरू करण्याची योजना होती. यामध्ये हावडा-इंदौर शिप्रा एक्सप्रेस, सियालदह-अमृतसर जालियांवाला बाग एक्सप्रेससह देशभरातील अनेक रूटच्या ट्रेनचा सहभाग होता. पण रेल्वे बोर्डाने या गाड्या सुरू करण्याच्या मंजूरीवर शिक्कामोर्तब केले नाही.

ट्रेन कमी असल्याने कन्फर्म सीट मिळण्यात अडचण
रेल्वेचे म्हणणे आहे, प्रवाशांची संख्या कमी असल्याने सध्याच्या ट्रेन पुरेशा आहेत. पण ट्रेनची संख्या अगोदरच्या तुलनेत खुपच कमी असल्याने स्पेशल ट्रेनमध्ये आता कन्फर्म सीट मिळणे अवघड झाले आहे. धनबादहून जाणारी हावडा नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस, हावडा जोधपुर एक्सप्रेस, हावडा नवी दिल्ली पूर्व एक्सप्रेस आणि कोलकाता अमृतसर दुर्गियाना एक्सप्रेसमध्ये या संपूर्ण महिन्यात एकही सीट रिकामी नाही.

मुंबईसाठी ट्रेन नाही, काऊंटरवरून परतत आहेत कँसरचे रूग्ण
गुजरात आणि मुंबईसाठी धनबादहून एकही ट्रेन नाही. या कारणामुळे प्रवाशांची समस्या वाढली आहे. विशेषकरून मुंबईत कँसरवर उपचार करण्यासाठी जाणारे प्रवाशी रोज काऊंटरवरून निराश होऊन परतत आहेत. बुकिंग कर्मचार्‍यांनुसार रोज सुमारे 25 ते 30 कँसर रूग्ण आणि त्यांचे कुटुंबिय मुंबई मेलमध्ये तिकिट बुक करतात. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ट्रेन बंद आहे, यामुळे त्यांना खुप मोठी समस्या भेडसावत आहे.