निमगाव केतकीत उद्या धनगर समाजाचा मेळावा

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा- शिवसेना- रिपाई (आठवले गट), शिवसंग्राम-रयत क्रांती या महायुतीमधील इंदापूर तालुक्यातील धनगर समाज कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे सोमवारी (दि.७) सकाळी १० वाजता निमगाव केतकी येथील केतकेश्वर मंगल कार्यालयामध्ये आयोजन करण्यात आले आहे. इंदापूर तालुक्यातील महायुतीच्या धनगर समाजातील नेत्यांची इंदापूर येथे नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मेळावा घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या विकासासाठी घेतलेल्या विविध निर्णयाचा फायदा इंदापूर तालुक्यातील धनगर समाजातील तळागाळातील लोकांना घेता यावा व विविध योजनांची माहिती समाज बांधवांना व्हावी यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील धनगर समाजाला आदिवासींच्या २२ सवलती राज्य शासनाने जाहीर केलेले आहेत.तसेच समाजासाठी १००० हजार कोटी रुपयांचा निधी शासनाने दिलेला आहे आहे.अशा विविध योजनांचा फायदा धनगर समाजातील तळागाळातील जनतेला आगामी काळात होणार आहे.

यावेळी बाबासाहेब चवरे, अविनाश मोटे,विलासराव वाघमोडे, बाळासाहेब पाटील, रामभाऊ पाटील, प्रतापराव पाटील, धनंजय खारतोडे, सतीश शिंगाडे, तुकाराम काळे, रणजीत पाटील, विजय पांढरे, अमोल देवकाते, गणेश पांढरे, भजनदास पवार, महेंद्र रेडके, माऊली चवरे तसेच धनगर समाजातील महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.तरी सदरच्या इंदापूर तालुका धनगर समाजातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Visit : Policenama.com