नगरमध्ये धनगर समाजाचा तर नाशिकमध्ये मातंग समाजाचा मोर्चा

अहमदनगर/नाशिक : पोलीसनामा

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजातर्फे अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यात बुधवारी भव्य मोर्चां काढण्यात आला होता. पाथर्डीतील खोलेश्वर मंदिरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. तर नाशिकमध्ये मातंग समाजाने देखील आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. यावेळी नागरिकांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेतले होते.

[amazon_link asins=’B01F7AX9ZA,B072XP1QB7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bd726a3f-ac16-11e8-985a-e3a28fa28ed2′]

धनगड हेच धनगर आहेत, केवळ धच्या ऐवजी ग असा उल्लेख झाल्याने संपूर्ण धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. राज्य सरकार जर ठोस पावले उचलणार नसेल, तर शांततेत निघणारे धनगर समाजाचे मोर्चे आक्रमक पवित्रा घेऊन तीव्र करण्यात येतील आणि त्यास जबाबदार राज्य सरकार राहील, असा इशारा पाथर्डीतील मोर्चाप्रसंगी देण्यात आला.

धनगर आरक्षण : संतप्त कार्यकर्त्यांकडून पुण्यातील आदिवासी प्रकल्प कार्यालयाची तोडफोड

तर नाशिक शहरात अनंत कान्हेरे मैदान ते शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मातंग समाज बांधवांनी मोर्चा काढला होता. मातंग समाज आणि तत्सम जातींवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी अनुसूचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या सर्व मंजूर शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. त्यासंदर्भात परिपत्रक काढून संबंधित खात्याला कळविण्यात यावे.  तसेच अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करावा अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली.

जाहीरात