धनगर आरक्षण : संतप्त कार्यकर्त्यांकडून पुण्यातील आदिवासी प्रकल्प कार्यालयाची तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेले आंदोलन शांत होत नाही तोवरच धनगर समाजाने आरक्षणाचा मुद्दा उचलून धऱला आहे. धनगर समाजालाा आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आज (शुक्रवार) पुण्यातील आदिवासी प्रकल्प कार्यालयाची केली तोडफोड केली.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a1621703-a781-11e8-a64d-416ec1083d06′]

धनगर समाजाच्या आरक्षण मिळावे यासाठी धनगर समजाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. समाजाची दिशाभूल करून खोटी माहिती देणाऱ्या आदिवासी प्रकल्प कार्यालयावर हल्ला करून धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. बार्टीच्या कार्यालयाजवळ असलेल्या व्हिआयपी गेस्ट हाऊसच्या बाजूला असलेल्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. कार्यकर्त्यांनी कार्यालयाची केली तोडफोड केली.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a670f348-a781-11e8-89a1-e540fb7059ec’]

काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदनामध्ये सांगितले होते कि, धनरगर समाजाला आरक्षण देण्यासाठी टाटा समाजिक संस्थेने सर्वे करुन अहवाल तयार केला आहे. लवकरच हा अहवाल सरकारला प्राप्त होईल. त्यानंतर राज्य सरकार केंद्राकडे शिफारस करेल. परंतु, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न १ सप्टेंबरपूर्वी करावा अशी आक्रमक भूमिका धनगर समाजाच्या आदोलकांनी घेतली आहे.

Loading...
You might also like