‘धनगर’ समाजासाठी PM मोदी घेणार ‘ऐतिहासिक’ निर्णय, 70 वर्षांचा ‘वाद’ मिटणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटिशकालीन व्यवस्थेमध्ये अनेक जातीतील मूळाक्षरामुळे वाद निर्माण झाला असून यामुळे अनेक अतिमागास वर्गाला शासकीय लाभ मिळत नाही. धनगर आणि धनगड या जातीतील वाद सोडवण्यासाठी आज केंद्र सरकारने ओबीसी आयोगाला मुदवाढ देण्याच निर्णय घेतला आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या बैठकीची माहिती देण्यासाठी शास्त्री भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रकाश जावडेकर यांनी बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती दिली. ओबीसी समाजातील विविध जातींचा अभ्यास करून एक केंद्रीय यादी निश्चित करण्यासाठी आयोग कार्य़रत आहे. राज्य घटनेच्या कलम 340 अंतर्गत या आयोगाची स्थापना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशाने करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील मागील अनेक वर्षापासून धनगर आणि धनगड यामध्ये वाद आहे. धनगर समाजाला यामुळे अनेक शासकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे, असा दावा समाजाचे नेते करत आहेत. त्यामुळे या आयोगाच्या माध्यमातून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ओबीसी आयोगाच्या सर्व शिफारशी आगामी 31 जुलै 2020 पर्यंत केंद्र सरकारला द्यावे अशा सुचना केंद्र सरकारच्या वतीने आयोगाला देण्यात आले आहेत. इंग्रजी मुळाक्षरांमध्ये जाती लिहल्यामुळे इंग्रजांच्या काळामध्ये अनेक जातींमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत. या त्रुटी सोडवण्याची जबाबदारी या आयोगाची आहे. आयोगाच्या अहवालानुसार केंद्र सरकार निर्णय घेणार आहे.

महाराष्ट्रातील धनगर समाजाने आरक्षणाची मागणी केली आहे. या समाजाला आरक्षण देयचे असेल तर स्थापन करण्यात आलेल्या आयोगाचा अहवाल महत्त्वाचा आहे. धनगर समाजाने अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे आयोगाच्या शिफारसीनंतर केंद्र सरकार धनगर समजाला न्याय देता येईल का याची तपासणी करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात अनेक वर्षापासून धनगर समजाचा वाद मिटण्याची शक्यता असून त्यासाठी केंद्र सरकार सक्रिय झाले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –