राष्ट्रीय

97 वर्षापासुन वाढली नाही ‘या’ गावाची लोकसंख्या, शेवटी काय आहे ‘या’ पाठीमागचं कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात एकीकडे लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना एक असे गाव आहे ज्याची लोकसंख्या 97 वर्षांपासून आहे तेव्हडीच आहे. मध्यप्रदेशाच्या बैतुल जिल्ह्यातील धनोरा हे असे गाव आहे ज्याची लोकसंख्या 1922 पासून 1700 एवढीच आहे. येथील कोणत्याच कुटुंबामध्ये दोन पेक्षा अधिक मुले नाहीत विशेष म्हणजे या ठिकाणचे लोक मुला मुलींमध्ये कोणताच भेदभाव करत नाही.

लोकसंख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे अनेक समस्या भेडसावत आहेत मात्र बैतुल मधील धानोरा गाव सर्वांसाठी एक आदर्श ठरत आहे. या गावची लोकसंख्या आहे तेवढीच राहिली याचीही एक मजेदार कहाणी आहे. एस.के. महोबिया सांगतात की, 1922 मध्ये कांग्रेसचे एक संमेलन झाले होते. ज्यामध्ये सामील होण्यासाठी कस्तुरबा गांधी आल्या होत्या त्यावेळी त्यांनी ग्रामीण जनतेला छोटा परिवार सुखी परिवार अशी घोषणा दिली होती. यानंतर येथील लोकांनी कुटुंब नियोजनावर भर दिला आणि मुला मुलींमधील भेदभाव विसरून दोनीही मुली झाल्या तरीही कुटुंब नियोजन तोडले नाही. दोनच आपत्यांवर कायम राहिल्याने गावची लोकसंख्या स्थिर राहिली.

कुटुंब नियोजनाच्या बाबतीत हा गाव एक आदर्श बनला. एवढेच नाही तर मुला मुलींमधील कोणताही भेदभाव या ठिकाणी होत नाही. या गावाच्या आसपास अनेक गावे आहेत परंतु त्यांची लोकसंख्या गेल्या वर्षांमध्ये अनेक पटींनी वाढलेली आहे. परंतु धनोरा गावची लोकसंख्या अजूनही 1,700 वर आहे. आरोग्य विभागाचे जगदीश सिंह परिहार सांगतात की, येथील स्थानिकांमध्ये कुटुंब नियोजनाबाबत जागरूकता आहे यामुळेच या ठिकाणी दोन आपत्त्यानंतर कुटुंब नियोजनाकडे लक्ष दिले जातात.

Visit : Policenama.com 

Back to top button