निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण मिळणार : मुनगंटीवार

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – धनगर समाजाला लोकसभा निवडणुकीपुर्वी आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  दिले. धनगर समाज सेवा संस्थेच्या वतीने आरक्षणाकरिता पालकमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले, देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्याकरिता केंद्राकडे शिफारस केली आहे. लवकरच आम्ही धनगर आरक्षण संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत.

निवडणुकीपुर्वीच धनगर समाजाला आरक्षण मिळेल अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धनगर समाजसेवा संस्थेच्या शिष्टमंडळाला दिली. यावेळी शिष्टमंडळात धनगर समाज सेवा संस्थेचे जिल्हाध्यक्ष जितू गोरडे, रामेश्वर लांडे, विनायक नन्नोरे, कृष्णा घोडे, सतिश धवने, कवडू बुरंगे, अनुप सरोदे, विठ्ठल गराड, माणिकराव बुरांडे, किशोर ढवळे, बाबाराव उघडे, मनिष निखार, ढोकणे, सुनील उपासे आदिंची उपस्थिती होती.

पीपल्स रिपब्लिकनच्या संविधान जनजागृती अभियान रॅलीस सुरुवात

आनेवाडी : पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने काढण्यात आलेल्या संविधान जनजागृती रॅलीचा पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथून पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शुभारंभ केला. दरम्यान, खंडाळा तालुका करून जावलीत दाखल झालेल्या या संविधान रॅलीचे तालुक्याच्या प्रवेशद्वारावर मोठ्या उत्साहात जावलीकरांनी स्वागत केले.

समाजा-समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊ नये व संविधान लोकांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा महासचिव संतोष सपकाळ यांनी ही संकल्पना मांडली. त्यानुसार सातारा जिल्हा कार्यकारिणीने या संविधान रॅलीचे आयोजन केले आहे. संपूर्ण सातारा जिल्हाभर ही संविधान रॅली फिरणार असून संविधान रॅलीचा २६ जानेवारीला सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल येथे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे, अशी माहिती जिल्हा कार्याध्यक्ष संजय गाडे यांनी दिली.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा महासचिव संतोष सपकाळ, जिल्हा कार्याध्यक्ष संजय गाडे, जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे, दीपक जाधव, शामराव कदम, गौतम काकडे, चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित होते.

शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी कामाला लागा : दिवाकर रावते