उपेक्षितांना समाजाच्या प्रवाहात सामील करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत – धनराज सोळंकी

लोकानुबंध सेवाभावी संस्थेचा उपक्रम

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाइन – समाजातील उपेक्षितांना प्रवाहात सामील करण्यासाठी सामुहिक प्रयत्न झाले पाहिजेत. अशी अपेक्षा भारतीय जैन संघटनेचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष धनराज सोळंकी यांनी व्यक्त केली.

येथील लोकानुबंध सेवाभावी संस्था व समाजविज्ञान महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने उपेक्षित, वंचित घटकांना दिवाळीनिमित्त फराळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धनराज सोळंकी बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. हनुमंत सोळंके, धनराज पवार, पवन गिरवलकर, लोकानुबंधच्या सचिव प्रतिमा कमलाकर कांबळे, सुलतान सय्यद, कोमल परदेशी, शरद काकडे, भाग्यश्री राठोड, प्रियंका दहिरे, विजय पाटणकर, शुभम डिडवाणी, राहुल गायकवाड उपस्थित होते. यावेळी पालावर व झोपडपट्टीत जाऊन उपेक्षित कुटुंबांना फराळाचे वाटप करण्यात आले.

दिवाळीचा सण साजरा करत असतांना वंचित घटक दिवाळीपासून उपेक्षित राहू नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे प्रतिभा कांबळे यांनी सांगितले. यावेळी प्रा. डॉ. हनुमंत सोळंके, धनराज पवार, पवन गिरवलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  फराळ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us