‘या’ ठिकाणी  विकली जात आहेत मोदींचा फोटो असलेली सोन्याची बिस्किटे

सुरत : वृत्तसंस्था – साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहुर्त म्हणून दिपावली सणाला गणले जाते. यामुळे अनेकजण या सणाच्या शुभ मुहर्तावर काही तरी नवीन खरेदी करतात. तर अनेक जण सुख, शांती मिळावी व धनप्राप्ती व्हावी, यासाठी दिपावलीला सोने, चांदिची मोठ्या प्रमणात खरेदी करतात. तर काही आर्थिक गुंतवणुकीचे साधन म्हणून खरेदी करतात.
धनत्रयोदशी निमित्त सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने सर्वसाधारण लक्ष्मी आणि गणेशचे फोटो असलेले सोन्या आणि चांदीचे बिस्किटे अथवा नाणे खरेदी करण्याची परंपरा आहे. पण भारतातील एका शहरात मात्र काही वेगळेच चित्र दिसत आहे. एका सोन्याच्या व्यापाऱ्याने धनत्रयोदशी दिवशी अनोखा प्रयोग केला आहे. या व्यापाऱ्याने चक्क एका राजकीय नेत्याचा फोटो असलेले बिस्टिके आणि नाणे तयार केली आहेत.
सलग तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तेवढेच  गुजराती  जनतेमध्ये लोकप्रिय आहेत . सुरतमधील एका व्यापाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले सोन्याची आणि चांदीची बिस्किटे तयार केली आहेत. विशेष म्हणजे या बिस्किटांची विक्री मोठ्या संख्येने होत आहे. त्याशिवाय माजी पंतप्रधान वाजपेयी यांची प्रतिमा असलेली बिस्किटे विक्रीस आहेत.
या बिस्किटांचे वजन १० ग्रॅम ते एक किलोपर्यंत आहे. या अनोख्या प्रयत्नामुळे संबंधित दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी ही बिस्किटे आकर्षणाचा केंद्र ठरली आहेत.
दिवाळी या  सणाला अनेक जण चांगले मुहूर्त आहे म्हणून सोने-चांदीची मोठ्याप्रमणात खरेदी करतात. काही आर्थिक गुंतवणुकीचे साधन म्हणून खरेदी करतात.