‘धनतेरस’च्या दिवशी ‘या’ वस्तु खरेदी करणं मानलं जात शुभ, पैशांनी भरून जाईल तुमचं घर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – धनतेरस जवळ आली आहे. अशात अनेक जण खरेदीचा विचार करत असतील. धनतेरसला सोने खरेदी आणि पितळ्याची खरेदी शुभ मानली जाते. या दिवसात केलेली खरेदी शुभ मानली जाते.

या शुभ खरेदीने लोकचे नशीब बदलते आणि देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते. याशिवाय धनतेरसला देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीचे पूजन शुभ मानले जाते. त्यामुळे पूर्ण वर्षभर घरात अन्न धान्याची कमी भासत नाही.

धनतेरसच्या दिवशी तुम्ही सोने खरेदी करु शकत नसाल तर तुम्ही एक छोटा चम्मचा देखील खरेदी करु शकतात. परंतू आपली समृद्धी कायम ठेवण्यासाठी तुम्हाला नियमित त्याचे पूजन करावे लागेल. त्यामुळे तुमची समृद्धी कायम राहिलं. एवढेच नाही तर या दिवशी तुम्ही धणे देखील खरेदी करु शकतात. हे तुमच्यासाठी शुभफलदायी ठरेल.

लक्ष्मी पूजेच्या वेळी धण्याच्या बिया लक्ष्मीच्या चरणी चढवा, पूजेनंतर एखाद्या बागेतील किंवा कोणत्याही मातीत या बिया पेरा. काही बिया गोमती चक्राबरोबर तिजोरीत ठेवा. धनतेरसच्या दिवशी लग्न झालेल्या महिलांना श्रृंगारची भेट देणे शुभ मानले जाते, याशिवाय लाल रंगाची साडी, कुंकू देखील देणे शुभ मानले जाते.

यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. तुम्ही एखाद्या कुमारी मुलीला देखील भेट देऊ शकतात. काही खरेदी करायलाच हवे असे नाही, परंतू या दिवशी चूकूनही काचेचे आणि अल्युमिनिअमची भांडी खरेदी करु नका. याला राहू शी संबंधित मानले जाते आणि या दिवशी ते घरी आणणे म्हणजे लक्ष्मीच्या आगमनापूर्वी राहूला घरात आणणे.

धनतेरसला व्यवसायाशी जोडलेल्याअनेक बाबी महत्वाच्या असतात, त्या खरेदी करणे लाभ कारक ठरेल, यामुळे तुम्हाला वर्षभर व्यवसायात यश मिळेल.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like