‘धनतेरस’ साठी करा खुप शॉपिंग मात्र ‘या’ 10 गोष्टी चुकूनही घरी आणु नका, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक जण मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. खरेदीसाठी हा एक मोठा दिवस समजला जातो. असे देखील समजले जाते की या शुभ दिनी सोने, चांदी आणि भांड्यांची खरेदी केल्यानी घरामध्ये सुख समृद्धी येते. या शुभ दिवसाच्या वेळी कोणत्या गोष्टींची खरेदी करावी हे सर्वांना माहित आहे मात्र कोणत्या गोष्टी घरात आणू नयेत याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

१) लोखंडाच्या गोष्टींची खरेदी करू नका
धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाची कोणतीही वस्तू खरेदी करू नका, जर तुम्हाला भांडी किंवा इतर गोष्टींची खरेदी करायची असेल तर ती एक दिवस आधी करा.

२) मोकळी भांडी आणू नका
या शुभ मुहूर्तावर घरामध्ये खरेदी केलेले कोणतेही भांडे रिकाम्या पद्धतीने आणू नका. जर भांड्यांची खरेदी करून आलेली असेल तर अशी प्रकारची भांडी पाण्याने भरून घरामध्ये आणा परंतु रिकाम्या पद्धतीने आणू नका.

३) स्टीलची देखील खरेदी टाळा
स्टील हा सुद्धा लोखंडाचा प्रकार आहे त्यामुळे या शुभ दिवशी लोखंडाची खरेदी करत नाहीत म्हणून स्टील रुपी देखील खरेदी टाळा. स्टील ऐवजी तांब्याच्या भांड्यांची किंवा इतर धातूच्या भांड्यांची खरेदी करा.

४) काळ्या रंगाच्या वस्तूंची खरेदी नको
काळ्या रंगाच्या वस्तूंची खरेदी करणे या दिवशीसाठी टाळले पाहिजे. काळा रंग हा राक्षसी प्रवृत्तीचे लक्षण आहे त्यामुळे या शुभ दिवशी अशा रंगाच्या वस्तूची खरेदी टाळा.

५) धारधार हत्यारांची खरेदी नको
या दिवशी तुम्ही खरेदीसाठी गेलाय तर धार धार हत्यारे जसे की चाकू, कात्री यांची खरेदी टाळा.

६) कार खरेदी बाबत महत्वाचे
जर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी कार गाडी घरी आणायची असेल तर नक्की आणा परंतु त्याबाबतचे आर्थिक व्यवहार एक दिवस आधीच पूर्ण करा.

७) खोट्या सोन्याबाबत महत्वाचे
हा शुभ मुहूर्तावर अनेकांना सोने खरेदी करण्याची सवय असते, परंतु या गोष्टीची नक्की काळजी घ्या की या शुभ दिवशी घरामध्ये खोटी ज्वेलरी, किंवा खोटी नाणी अजिबात आणू नका.

८) तेलाची खरेदी नको
या शुभ दिनी तेल किंवा तळाशी निगडित घटक टाळणे शक्यतो टाळावे. महत्वाचे म्हणजे या दिवशी दिवे लावण्यासाठी तेलाची गरज पडतेच त्यामुळे आधीच या गोष्टींची खरेदी करून ठेवावी.

९) काचेच्या वस्तू नकोत
काचेचा संबंध राहुशी निगडित असतो त्यामुळे या दिवशी काचेच्या वस्तूंची खरेदी टाळावी. तसेच काचेच्या वस्तूंचा वापर देखील या दिवसात टाळावा.

१०) रोख रक्कम देणे टाळावे
धनत्रयोदशीच्या भेटवस्तूंची खरेदी आणि वाटप करणे शुभ मानले जाते. मात्र हा कार्यक्रम शक्यतो एक दिवस आधीच करावा कारण या शुभ दिवशी लक्ष्मी घराबाहेर जाऊ द्यायची नसते तर घरामध्ये ठेवायची असते. यामुळे भेट वस्तूंऐवजी रोख रक्कम देणे टाळावे.

Visit  :Policenama.com