‘या’ कारणामुळं दिवाळीनंतर सोनं खरेदी करणं होणार ‘स्वस्त’, जाणून घ्या ‘धनतेरस’ला ‘गोल्ड’शी संबंधित महत्वाच्या गोष्टी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – आर्थिक स्थुलता आणि इक्विटी बाजारात मोठी घसरणं झाल्यानंतर सोन्याच्या किंमती लागोपाठ वाढत आहेत. धनतेरसच्या दिवशी स्थानिक बाजारात सोने 75 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढले. त्यामुळे सोने महागून 38,945 रुपये झाले. मागील दिवाळीपासून या वर्षापर्यंत सोन्याच्या किंमतीवर 30 टक्के जास्त रिटर्न मिळाला. मागील महिन्यात सोने लागोपाठ 30 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमने स्तिरावले.

जागतिक बाजाराच्या तुलनेत भारतात 10 टक्के सोने महाग –
जानकारांच्या मते जागतिक परिस्थिती आणि जगभरातील मध्यवर्ती बँकांद्वारे गोल्ड रिझर्व वाढवण्यासाठी सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. जागतिक बाजाराच्या तुलनेत भारतीय बाजारात सोने जवळपास 10 टक्के अधिक महाग आहे. भारतात सोने आयातीवर 10 टक्के आयात शुल्क लागते, भारतात सोन्यावर 3 टक्के जीएसटी देखील आकारला जातो.

दिवाळीनंतर 3 – 4 टक्क्यांनी सोने होणार स्वस्त –
केडिया कमोडिटीचे प्रबंध निदेशक अजय केडिया यांनी सांगितले की, जागतिक स्थिरतेनंतर सोन्याच्या किंमतींना आधार मिळाला. तर जगभरात भू-राजकिय तणावामुळे सोन्याच्या किंमतीत तेजी पाहायला मिळाली.केडिया यांनी सांगितले की, पुढील दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमतीचा विचार केला की 43,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, परंतू यंदाच्या दिवाळीनंतर सोने जवळपास 3 – 4 टक्क्यांनी स्वस्त होईल. त्यामुळे गुंतवणूकदार आणि सामान्य लोकांच्या सोने खरेदीमुळे सोन्याच्या भावात तेजी येणार नाही.

धनतेरसच्या दिवशी आणि लग्नाच्या मुहूर्तादरम्यान सोन्याची मागणी सोडली तर 2003 साली लोकांमध्ये फिजिकल गोल्ड शिवाय दुसऱ्या पर्यायांमध्ये रुची पाहायला मिळाली. याचं सर्वात मोठे कारणं लोकांना फिजिकल गोल्डपासून इतर पेपर गोल्डमध्ये गुंतवणूकाचा पर्याय मिळाला आहे.
सोन्यात गुंतवणूकीने कमाईशिवाय लोकांना गोल्ड डिलीवरीचा पर्याय मिळत आहे. गुंतवणूकदारांशिवाय सामान्य लोक देखील पेटीएम गोल्ड, सॉवरेन गोल्ड बॉन्ड, गोल्ड ईटीएफ सारख्या गुंतवणूकीच्या पर्यायाचा फायदा घेत आहेत.

एमसीएक्स गोल्ड गुंतवणूकीत कमीत कमी 1 ग्रॅम सोने खरेदीचा पर्याय मिळले. एसीएक्स गोल्डमध्ये गुंतवणूकीची खास बाब म्हणजे किमान 1 ग्रॅम सोने देखील आपल्या डीमॅट खात्यात ठेवता येते, गरज भासल्यास डिलीवरी देखील घेता येते.

सोन्यापेक्षा जास्त परतावा –
केडिया यांनी सांगितले की पेपर गोल्डदरम्यान गुंतवणूकदार एकूण पोर्टफोलियोमध्ये 4 टक्क्यापर्यंत सोने निवेश करु शकतात, परंतू पेपर गोल्ड आल्यानंतर त्यांनी आपली गुंतवणूक वाढवली आहे.
याचे एक कारण हे पण आहे की मागील 10 वर्षात सोन्यात दुप्पट आकड्यांनी परतावा मिळाला, जो शेअर बाजारात केलेल्या गुंतवणूकीच्या तुलनेत मागील 10 वर्षात निफ्टीने सरासरी 10 टक्के रिटर्न मिळेल.

देशभरात लोकांच्या घरात एकूण 20 हजार टन सोने –
सराफ बाजारात दुकानदारांच्या मते सोन्याच्या किंमतीत तेजीचे कारण बार्टर सिस्टम आहे. म्हणजेच सामान्य लोक जुन्या सोन्याचा बदल्यात नवे सोने बदलून घेतात. सराफांच्या मते, सरासरी 30 ते 40 टक्के लोक बार्टर सिस्टमला महत्व देतात, जवळपास 60 टक्के लोक नवे सोने खरेदी करत आहेत. आकडे तर हे देखील सांगितले जाते की सध्याचा क्षणाला लोक घरात जवळपास 20 हजार टन सोने ठेवतात.

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा