100 वर्षानंतर धनतेरसचा ‘शुभ’ योग, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विष्णुचे अवतार आणि आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांची जयंती कार्तिक कृष्ण त्रयोदशीला (25 ऑक्टोबर) साजरी केली जाईल. धनत्रयोदशीच्या दिवशी दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते. या दिवशी कुटुंबाचे आरोग्य चांगले रहावे म्हणून घराच्या मुख्य दारावर यमदेवाचे नामस्मरण करून दक्षिण दिशेला नैवद्य ठेऊन दिवा प्रज्वलित करा.

धनत्रयोदशी मुहूर्त –
पूजा मुहूर्त – संध्याकाळी 7:06 ते 08:16
प्रदोष कालावधी – सायंकाळी 05:39 ते 08:14
वृषभ कालावधी – संध्याकाळी 7 ते 8:56 पर्यंत
मंत्र – ॐ नमो भगवते धन्वंतराय विष्णुरूपाय नमो नमः।

100 वर्षानंतर योग –
धनतेरस म्हणजे गोरख मुहूर्त. धनत्रयोदशीच्या दिवशी शुक्रवारी शुक्र प्रदोष आणि धन त्रयोदशीचा महायोग बनत आहे. हा ब्रह्मा आणि सिद्धी योग बनत आहे. असा शुभयोग 100 वर्षांनंतर पुन्हा येत आहे. या दिवशी जे काही शुभ कार्य किंवा खरेदी केली जाते ती समृद्धिकारक मानली जाते.

धनत्रयोदशी कथा
जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like