धनतेरसला खरेदी करण्याचे ‘हे’ शुभ मुहूर्त, ‘या’ 2 तासांदरम्यान चुकूनही नका करू शॉपिंग, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – धनतेरसचे पर्व कार्तिक कृष्ण त्रयोदशी मानली जाते, असे म्हणतात या दिवशी समुद्र मंथनादरम्यान अमृत कलश घेऊन देवतांचे वैद्य धनवंतरी प्रकट झाले. आरोग्य संरक्षण आणि आरोग्यासाठी धनवंतरी देवतेची उपासना केली जाते. या दिवशी भगवान कुबेराची देखील पूजा केली जाते आणि धन संपत्तीला पूजले जाते. या दिवशी लोक मौल्यवान धातू, भांडी, दागिणे यांची खरेदी करतात. भांडी किंवा मूर्त्यांची खरेदी करुन दिवाळीची मुख्य पूजा केली जाते, आज देशात धनतेसरचे पर्व साजरे करण्यात येईल.

धनतेरसच्या दिवशी कोणती खरेदी – धातूची भांडे (शक्यतो पाण्याचे भांडे), गणेश – लक्ष्मीची पूजा करण्यासाठी वेगवेगळ्या मूर्त्या असाव्यात. लाह्या बत्ताशे आणि पणत्या, एक मोठी पणती याची खरेदी करावी.

धनतेरसला कोणत्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी खरेदी केली पाहिजे –
आर्थिक लाभासाठी भांडी, उद्योगात विस्तार आणि उन्नतीसाठी धातूची पणती, संतानसंबंधित समस्येसाठी वाटी, आरोग्यासाठी आणि आयुष्यासाठी धातूची घंटी तसेच घरात सुख, शांती आणि प्रेमासाठी जेवणाची भांडी खरेदी करावीत.

कशी उपासना करावी –
– संध्याकाळी कुबेर आणि धनवंतरीची स्थापन
– त्यासमोर तूपाचा दिवा
– गोड पदार्थ
– ॐ ह्रीं कुबेराय नमः चा जप
– धन्वन्तरि स्तोत्राचे पठन
– प्रसाद, पूजेनंतर दिवाळीला कुबेराला धनाच्या स्थानी आणि धनवंतरीला पूजेच्या स्थानी स्थापित करावे.

पूजा आणि खरेदीचा मुहूर्त –
दुपारी – 12.00 ते 1.30 वाजेपर्यंत खरेदीचा मुहूर्त
रात्री – 9.00 ते 10.30 दरम्यान खरेदीचा मुहूर्त
पूजेची वेळ – सकाळी 10.30 ते 12.00 च्या दरम्यान पूजा आणि खरेदी करु नये.

धनतेरसला ठेवा या गोष्टीकडे लक्ष द्या –
धनतेरसच्या दिवशी घराच्या सफाईचे काम करु नका. या दिवशी कुबेराची पूजा करु नये परंतू धनवंतरी देवाची उपासना नक्की करा. यादिवशी सोने, पितळ, चांदी किंवा स्टीलची खरेदी करा.
दिवाळीच्या दिवशी गणेश – लक्ष्मीची मूर्ती आणि उतर पूजा सामुग्री आजच खरेदी करा. धनतेरसच्या दिवशी लोखंड खरेदी करु नका. या दिवशी दान करणं देखील शुभ मानले जाते, हे दान निर्धनांना करा, ते जास्त लाभकारक ठरेल.

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा