Dhanteras 2020 : धनत्रयोदशीला राशीनुसार खरेदी करा ‘या’ वस्तू, कधीही रिकामा होणार नाही धनाचा साठा

पोलीसनामा ऑनलाइन – धनत्रयोदशीचा सण आरोग्य आणि धनाशी संबंधित आहे. या दिवशी धनासाठी कुबेर आणि आरोग्यासाठी धन्वंतरीची उपासना केली जाते. याच दिवशी धन्वंतरी आपल्या हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. यासाठी या दिवशी संपन्नता, समृद्धी आणि आरोग्यासाठी लोक धातू, दागिनी आणि भांडी खरेदी करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी योग्य खरेदी तुम्हाला लाभ देऊ शकते आणि यामुळे तुमच्या समस्यासुद्धा दूर होऊ शकतात. धनत्रयोदशीला राशीनुसार कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात ते जाणून घेऊयात…

मेष –
सोन्याची किंवा पितळेची वस्तू खरेदी करा. यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होतात. धनहानी होत नाही.

वृषभ –
वाहन, कपाट किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी कराव्यात. यामुळे भाग्याची साथ लाभते. कौटुंबिक जीवनातील बाधा दूर होतात.

मिथुन –
कांस्य धातूची भांडी किंवा मूर्ती खरेदी कराव्यात. यामुळे निर्णय क्षमता चांगली होते. संततीच्या समस्या दूर होते.

कर्क –
पितळ किंवा सोन्याच्या वस्तू खरेदी कराव्यात. यामुळे भावनात्मक समस्यांमध्ये सुधारणा होतील. अडकलेली कामे मार्गी लागतील.

सिंह-
तांब्याचे पात्र, तेसुद्धा घरी पाणी भरून आणले तर उत्तम आहे. असे केल्याने आरोग्य उत्तम राहते. सोबत संपत्तीसंबंधी समस्या दूर होतील.

कन्या –
इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करणे उत्तम ठरेल. यामुळे तुमच्या पैशाच्या समस्या दूर होतील. नवी कामे करण्यासाठी मार्ग खुले होती.

तूळ –
कांस्य धातूच्या देवी-देवतांच्या प्रतिमा खरेदी करणे उत्तम ठरेल. यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. सोबतच करिअर आणि पैशांची स्थिती सुधारेल.

वृश्चिक –
चांदीचे नाणे किंवा चांदीचे भांडे खरेदी करणे चांगले ठरेल. यामुळे कर्जाची स्थिती आणि धनप्राप्तीत सुधारणा होईल. सोबतच आरोग्याची समस्या आणि अपघातापासून रक्षण होईल.

धनू –
तांब्याचा दिवा खरेदी करा. यामुळे करिअरमध्ये अडथळे दूर होतील. सोबतच पद, प्रतिष्ठा आणि मान सन्मानाचा लाभ होईल.

मकर –
कांस्य धातूची मूर्ती किंवा भांडे खरेदी करा. यामुळे जीवनातील संघर्ष कमी होईल. सोबतच कौटुंबिक जीवनातील समस्या दूर होतील.

कुंभ –
चांदीचे भांडे, विशेषकरून पाण्याचे भांडे खरेदी करा. यामुळे मानसिक स्थितीत सुधारणा होईल. पैशाच्या समस्या दूर होतील.

मीन –
तांब्याचे पात्र खरेदी करा. यामुळे करिअरमध्ये मनासारखे बदल कराल. सोबतच विवाह संबंध सुधारतील.