Dhanteras 2020 : ‘धनतेरस’च्या दिवशी जरूर करा घराच्या ‘या’ चार भागांची ‘स्वच्छता’, उजळेल नशीब

पोलीसनामा ऑनलाइन – दिवाळी (Diwali 2020) पूर्वी लोक घराची स्वच्छता करण्यास सुरुवात करतात. परंतु आपणास हे माहीत असावे की धनतेरस (Dhanteras 2020) च्या दिवशी घरात काही ठिकाणी साफसफाई करण्यासही मोठे महत्त्व आहे. असे केल्याने आपली आवक, आपली संपत्ती आणि भाग्य भगवान धन्वंतरी, कुबेरदेव आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने चमकेल.

वास्तूनुसार घराची ईशान्य बाजू सर्वात महत्त्वाची असते. त्यास देवांचे स्थान म्हणतात. म्हणूनच, प्रत्येक घरात मंदिर सामान्यत: या कोपऱ्यात बनवले जाते. घराचा ईशान्य कोपरा उत्तर-पूर्व दिशेला म्हटले जाते. धनतेरसच्या दिवशी हा कोपरा स्वच्छ केलाच पाहिजे. जर घराचे हे क्षेत्र घाणेरडे आहे किंवा अशा गोष्टी या ठिकाणी ठेवल्या गेल्या आहेत, ज्याचा आपण कधीही वापर करत नसाल, तर अशा घरात माता लक्ष्मी प्रसन्न होणार नाही. म्हणूनच, आपल्या घराचा ईशान्य कोपरा नेहमीच स्वच्छ ठेवावा.

पूर्वेकडील दिशा : धनतेरसच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराच्या पूर्वेकडील जागा जरूर स्वच्छ करा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. घरात माता लक्ष्मी वास्तव्य करते.

उत्तर दिशा : घराच्या उत्तर दिशेची स्वच्छतादेखील महत्त्वपूर्ण आहे. असं म्हणतात की यामुळे घरात माता लक्ष्मी वास्तव्य करते.

ब्रह्म स्थान : सर्वांत महत्त्वाचे म्हणजे घराच्या मध्यभागी ब्रह्म स्थान असते. येथून अनावश्यक सामान हटवून त्यास स्वच्छ करा.