25 ऑक्टोबरला धनत्रयोदशी, त्या दिवशी ‘या’ वस्तु खरेदी करणं अशुभ असतं, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – दिवाळी आधी 25 ऑक्टोबरला धनतेरस आहे. धनतेरसला करण्यात येणारी खरेदी, शुभ कामाची सुरुवात अत्यंत चांगली मानली जाते. धनतेरसला लक्ष्मी कुबेरची पूजा जीवनात सुख समृद्धी आणते. धनतेरसला नव्या वस्तूंची खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी ग्राहक वस्तू बाजारातून खरेदी करुन धनतेरसला त्याची पूजा करतात. परंतू काही वस्तू अशा असतात ज्यांची खरेदी या दिवशी अशुभ मानली जाते, त्यामुळे अशा काही वस्तू आहेत ज्या धनतेरसला खरेदी करु नये.

लोखंडाच्या वस्तू –
धनतेरसला लोखंडी वस्तू खरेदी करणे अशुभ मानण्यात येते. यामुळे घरावर राहू ग्रहाची अशुभ छाया पडते. राहूची नजर पडताच कुटूंबात अडचणी उद्भवतात.

काचेच्या वस्तू –
काचेच्या वस्तूंचा संबंध देखील राहू ग्रहांशी जोडला जातो, यामुळे धनतेरसला काचेच्या वस्तू खरेदी केल्या
जात नाहीत.
लोखंडच्या वस्तूंबरोबरच अ‍ॅल्यूमिनियमच्या वस्तू देखील धनतेरसला खरेदी केल्या जात नाहीत, याचा संबंध राहूशी आहे. यामुळे घरात अशुभ घटना घडते.

काळ्या रंगाचे कपडे –

धनतेरसच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा दागिने खरेदी करु नयेत. काळा रंग दुर्भाग्याचा रंग मानला जातो. धनतेरसला तेल किंवा तेलाच्या उत्पादनांसारखे तूर, रिफाइंड याची खरेदी करुन नये. धनतेरसला दिवा लावण्यासाठी तूपाची, तेलाची गरज पडते यामुळे हे पदार्थ पहिल्यांदाच खरेदी करावेत

Visit : Policenama.com