Dhantrayodashi 2021 | धनत्रयोदशी 2 नोव्हेंबरला, जाणून घ्या खरेदीचा शुभ मुहूर्त, पूजन विधी आणि पौराणिक कथा

नवी दिल्ली : Dhantrayodashi 2021 | हिंदू पंचांगनुसार, दरवर्षी कार्तिक मास त्रयोदशीला धनत्रयोदशीचा सण (Dhantrayodashi 2021) साजरा केला जातो. पौराणिक मान्यतांनुसार, कार्तिक मास कृष्णपक्षाच्या त्रयोदशीच्या दिवशीच भगवान धन्वंतरी पृथ्वीवर समुद्र मंथनादरम्यान प्रकट झाले होते. यावर्षी ती तिथी 2 नोव्हेंबरला आहे. जाणून घ्या धनत्रयोदशीचे शुभमुहूर्त, पूजाविधी आणि पौराणिक कथा-

धनत्रयोदशी पूजाविधी –

1. चौरंगावर लाल कपडा टाका.

2. आता गंगाजल शिंपडून भगवान धन्वंतरी, लक्ष्मीमाता आणि भगवान कुबेराची प्रतिमा किंवा फोटो स्थापन करा.

3. देवासमोर तूपाचा दिवा, धूप आणि अगरबत्ती लावा.

4. आता देवी-देवतांना लाल फूल अर्पण करा.

5. ज्या धातुची किंवा भांडे अथवा ज्वेलरीची खरेदी केली असेल ते चौरंगावर ठेवा.

6. लक्ष्मी स्तोत्र, लक्ष्मी चालीसा, लक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र आणि कुबेर स्तोत्र पठण करा.

7. धनत्रयोदशीच्या (Dhantrayodashi 2021) पूजेदरम्यान लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करा आणि मिठाईचा नैवद्य अर्पण करा.

Pune Accident | दुर्दैवी ! बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

धनत्रयोदशी शुभ मुहूर्त (Dhantrayodashi 2021) –

धनत्रयोदशी पूजा मुहूर्त 2 नोव्हेंबरच्या सायंकाळी 06 वाजून 18 मिनिटांपासून रात्री 08 वाजून 10 मिनिटापर्यंत आहे. प्रदोष काळ सायंकाळी 05 वाजून 32 मिनिटांपासून रात्री 08 वाजून 10 मिनिटांपर्यंत राहिल. वृषभ काळ सायंकाळी 06 वाजून 18 मिनिटांपासून रात्री 08 वाजून 13 मिनिटापर्यंत राहिल. त्रयोदशी तिथी 2 नोव्हेंबरच्या सकाळी 11 वाजून 31 मिनिटांपासून 3 नोव्हेंबरच्या सकाळी 09 वाजून 02 मिनिटांपर्यंत राहिल.

Dhantrayodashi धनत्रयोदशी संबंधी पौराणिक कथा –

एका पौराणिक कथेनुसार, कार्तिक कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीच्या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी प्रकट झाले होते तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश होता. तेव्हा पासून धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करण्याची सुद्धा परंपरा आहे. असे मानले जाते की, यामुळे सौभाग्य, वैभव आणि आरोग्यलाभ होतो. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची कुबेर यांची विधीवत पूजा केली जाते.

महालक्ष्मी बीज मंत्र

ओम श्री श्री आये नम: – याए मंत्राला महालक्ष्मीचा बीजमंत्र म्हटले जाते. म्हणतात की, धनत्रयोदशीच्या दिवशी मंत्राचा जप केल्याने मनोकामना पूर्ण होतात. धन-धान्याची प्राप्ती होते.

हे देखील वाचा

Pune Crime | आर्यन खान ड्रग्ज केसमधील NCB चा पंच किरण गोसावीवर फसवणूकीसह पिस्तुल दाखवून धमकाविल्याचा गुन्हा दाखल

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान मन्नतवर पोहचला पण ‘या’ कारणामुळं मुनमुन धमेचा तुरूंगातच अडकली, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Dhantrayodashi 2021 | dhanteras 2021 dhanteras on november 2 know the auspicious time for shopping worship method and mythology

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update