Dhanush-Aishwarya Divorce | दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि ऐश्वर्या हे पॉवर कपल होणार विभक्त

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि सुपर स्टार राजनिकांतची मुलगी (Rajinikanth Daughter) ऐश्वर्या (Aishwarya) ही जोडी पॉवर कपल म्हणून प्रसिद्ध होती. मात्र, तब्बल १८ वर्षानंतर या जोडीने वैवाहिक आयुष्यातून वेगळे होण्याचा निर्णय (Dhanush-Aishwarya Divorce) घेतला आहे. दोघांनीही सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत ही माहिती दिली असून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (Dhanush-Aishwarya Divorce)

 

ट्विटरवर धनुषने केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, गेली १८ वर्षे आम्ही दोस्ती, कपल, परेन्ट्स आणि एकमेकांचे शुभचिंतक होऊन समजूतदारपणा दाखवून वैवाहिक आयुष्याचा मोठा काळ पार पडला. पण आज आम्ही जिथे उभे आहोत तिथून आमचे मार्ग मोकळे होतात. मी आणि ऐश्वर्याने कपल चौकटीतून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: ला आणखी चांगलं समजण्यासाठी आम्ही वेळ घेत आहोत, असे या पोस्टमध्ये लिहिले आहे. तसेच आमच्या निर्णयाचा सन्मान करा. आमच्या खासगी आयुष्याचा विचार करा असेही धनुषने शेवटी म्हंटले आहे. (Dhanush-Aishwarya Divorce)

 

दरम्यान, दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमधील (Tollywood) एक प्रसिद्ध कपल सामंथा (Samantha Akkineni) आणि नागा चैत्यन्य (Naga Chaitanya) यांचाही २ ऑक्टोबरला घटस्फोट (Naga Chaitanya Samantha Divorce) झाला होता. विशेष म्हणजे या दोघांच्या विवाहाला ६ ऑक्टोबरला ४ वर्षे पूर्ण होणार होती पण तत्पूर्वीच घटस्फोट घेतला. त्यानंतर या घटनेला तीन महिने होण्याच्या आतच धनुष आणि ऐश्वर्या वेगळे होत असल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

 

Web Title :- Dhanush-Aishwarya Divorce | dhanush and aishwaryas divorce big shock to the fans Dhanush Aishwarya Divorce

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा