Dhanushyaban Symbol | ‘जनतेसोबत सैनिक गेले, इतके अनर्थ…’, धनुष्यबाण चिन्हावरुन भाजपचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर शिंदे गटाने खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा करुन धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर (Dhanushyaban Symbol) दावा केला. हा वाद सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेल्यानंतर धनुष्यबाण चिन्हाबाबतचा (Dhanushyaban Symbol) निर्णय निवडणूक आयोग (Election Commission) घेणार असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले. त्यानुसार शनिवारी आयोगाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवण्याचा निर्णय घेतला. आयोगाच्या निर्णयानंतर भाजपने (BJP) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना खोचक टोला लगावला आहे. भाजपचे नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विट करत मुख्यमंत्रीपदाच्या लोभानेच हे चिन्ह गेल्याचे म्हटले आहे.

 

 

काय म्हणाले केशव उपाध्ये?

भाजप नेते केशव उपाध्ये यांनी धनुष्यबाणा या चिन्हावरुन (Dhanushyaban Symbol) खोचक टोला लगावला आहे. मुख्यमंत्रीपदापायी मती गेली, मतीविना हिंदुत्वनीती गेली, नीतीविना जनता गेला. जनतेसोबत सैनिक गेले, सैनिकानंतर चिन्ह व पक्षही गेला, इतके अनर्थ मुख्यमंत्रीपदाच्या लोभाने केले, असे ट्विट उपाध्ये यांनी केले आहे.

 

निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा उद्धव ठाकरेंना धक्का देत धनुष्यबाण चिन्ह तात्पुरते गोठवण्याचा निर्णय घेतला.
तसेच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही, असेही आयोगाकडून सांगण्यात आले.
त्यामुळे दोन्ही गटाला ‘ठाकरे गट’ (Thackeray Group) आणि ‘शिंदे गट’ (Shinde Group) ही नावे वापरावी लागणार आहेत.
हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

 

Web Title :- Dhanushyaban Symbol | keshav upadhye tweet on uddhav thackeray after eci freez bow and arrow sign

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा