ब्रेकिंग : बॉलीवूड अभिनेता आसिफ बसरानं धर्मशाळामध्ये केली आत्महत्या, पाळीव कुत्र्याच्या पट्ट्यानं घेतली फाशी

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आसिफ बसरा (Asif Basra) यानं आत्महत्या केली आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे आसिफनं गुरुवारी मॅकलोडगंजमधील जोगिवाडा रोडवरील एका कॅफेजवळ सुसाइड केलं आहे. अभिनेत्यानं हे टोकाचं पाऊल का टाकलं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. असं सांगितलं जात आहे की, आसिफ बसरा गेल्या 5 वर्षांपासून मॅक्लोडगंजमधील एका भाड्याच्या घरात राहत होता. एक परदेशी मैत्रिणही त्याच्यासोबत राहत होती. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.