लग्नासाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू

कांगडा (हिमाचल प्रदेश) : वृत्तसंस्था – लग्नासाठी घरी आलेल्या लष्करातील जवानाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात ही दुर्दवी घटना घडली आहे. मृत जवानाचे नाव सिकंदर (वय-25) असून ते बठिंडा इथे तैनात होते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायट बाजारातून सिकंदर दुचाकीवरुन जात असताना त्यांना कारने उडवले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना शाहपूर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होत. मात्र मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

चार वर्षांपूर्वी सैन्यात भरती झालेले सिकंदर बठिंडायेथे तैनात होते. ते 15 दिवसांच्या सुट्टीवर घरी आले होते. 14 ऑक्टोबरला ते ड्युटीवर परत जाणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. सिकंदरचे वडील हरबंस लाल शेतकरी आहेत.

Visit  :Policenama.com

You might also like