Dharavi Bank Teaser | एम एक्स प्लेअरवर ‘धारावी बँक’ या नवीन वेब सीरिजचा टिझर आउट ; ‘ही’ अभिनेत्री असणार मुख्य भूमिकेत

पोलीसनामा ऑनलाईन : Dharavi Bank Teaser | ‘आश्रम’ (Aashram), ‘भौकाल’ (Bhaukaal) आणि ‘रक्तांचल’ (Raktanchal) सारख्या वेब सिरीज नंतर आता एम एक्स प्लेअर (Mx-Player) वर एक नवीन सिरीज (Web Series) प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि सोनाली कुलकर्णी यांची (Sonali Kulkarni) दमदार अभिनय असलेली ‘धारावी बँक’  या सिरीजचा टिझर अखेर रिलीज झाला. या टिझरने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. टिझर पाहून सिरीज हिट होईल यात काही शंका नाही. ही संपूर्ण सिरीज आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी (Dharavi) परिसरावर आधारित आहे.

Advt.

या सिरीजमध्ये सुनील शेट्टी अण्णा ही भूमिका साकारताना दिसत आहे. तर विवेक ओबेरॉय खाकी वर्दीत दिसणार आहे. या सिरीज मध्ये सुनील शेट्टी आणि विवेक ओबेरॉय एकमेकांसमोर दिसणार आहेत. धारावी परिसरातील मुख्य सूत्रधार हा सुनील शेट्टी म्हणजेच अण्णा असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर गुन्हेगारांना पकडण्याचा एकच मानस विवेकचा म्हणजेच अभिनेता विवेक ओबेरॉयचा असल्याचे दाखवण्यात आले. या सिरीजमध्ये या दोघांमध्ये होणाऱ्या रंजक आणि थरारक घटना हे सगळ्यांचे लक्ष वेधून घेणार आहे.

प्रेक्षक आता या टिझर (Dharavi Bank Teaser) नंतर या सिरीजचा ट्रेलर त्याचबरोबर संपूर्ण सिरीजची आतुरतेने
वाट पाहत आहेत. ही सिरीज समित कक्कड (Samit Kakkad) यांनी दिग्दर्शित केली असून झी स्टुडिओ ने या
सिरीजची निर्मिती केली आहे.

Web Title :-  Dharavi Bank Teaser | dharavi bank mx player web series teaser release suniel shetty vivek oberoi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sourav Ganguly | सौरभ गांगुलीच्या BCCI अध्यक्षपदाचा वाद न्यायालयात, कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल

Maharashtra Politics | ‘रणछोडदास’ मैदान सोडून पळून गेले’, शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका