आशियातील ‘टॉप’ १० पर्यटन स्थळांमध्ये वाह ‘ताज’महल नाही ; मुंबईतील धारावी झोपडपट्टी पर्यटकांचे ‘आकर्षण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ट्रीप ऍडव्हाझर या वेबसाईटने आशिया खंडातील पर्यटन एक अहवाल सादर केला आहे. धक्कादायक म्हणजे आशिया खंडातील पहिल्या दहा पर्यटनस्थळांमध्ये जगप्रसिद्ध ताजमहल नाहीये, आणि आश्चर्य म्हणजे या यादीत भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी झोपडपट्टी या पर्यटन स्थळांच्या यादीत १०व्या स्थानावर आहे.

भारतातील कुतुबमीनार, ताजमहल, जम्मू-काश्मीर, उटी, कन्याकुमारी, केरळ असे अनेक परिचित आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. पण ट्रीप ऍडव्हाझर या वेबसाईटने दिलेल्या अहवालातील पहिल्या १० स्थळांमध्ये यांचा समावेश नाही. तर मुंबईतील धारावी झोपडपट्टीचा समावेश आहे. पर्यटक धारावी झोपडपट्टी पाहण्यासाठी, तेथील लोकांच्या अनुभव ऐकण्यासाठी उत्सुक आहेत, हे समोर येत आहे.

‘टॉप १० ट्रक्हलर्स चॉइस एक्सपिरियन्स २०१९- कर्ल्ड ऍण्ड आशिया’ या सर्वेक्षणात पर्यटकांना भारतातील कोणत्या गोष्टी पाहायला आणि अनुभवायला आवडतात हे विचारण्यात आले. पर्यटकांनी जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांऐवजी स्थानिक लहान ठिकाणांना अधिक पसंती दिली आहे. याच यादीमध्ये धारावी दहाव्या क्रमांकावर आहे. तर धारावीनंतर जुन्या दिल्लीचा नंबर लागतो, मग ताजमहल आणि आग्र्याच्या किल्ल्याचा क्रमांक लागतो.

अहवालानुसार आशियामधील टॉप १० पर्यटन स्थळे

१. उबूडमधील जंगली झोपाळा, उबूड, इंडोनेशिया

२. शिआनमध्ये फूड टूर, शिआन, चीन

३. बीजिंग हूटॉग फूड आणि बीयर टूर,

४. बीजिंग, चीन

५. थाय आणि आखा कुकिंग क्लास, चीआंग माय, थायलंड

६. हानोई स्ट्रीट फूड टूअर, हानोई, क्हिएतनाम

७. टोकियो बायकिंग टूर, रोपाँगी, जपान

८. कु ची टनलमधून स्पीडबोटने फेरी, हो ची मिंच शहर, क्हिएतनाम

९. अँगकोर कॅट टूर, सिम रिऍप, कंबोडिया

१०. धारावी टूर, मुंबई, हिंदुस्थान

भारतातील पर्यटन स्थळे

१. एक्सप्रेस ट्रेनने दिल्ली-आग्रा प्रवास करून ताजमहल दर्शन

२. दिल्लीतील शॉपिंग, दिल्लीच्या जुन्या बाजारामध्ये फेरफटा मारणे

३. मास्तरजी की हकेली

४. मुंबई दर्शन, बॉलीवूड दर्शन

५. दिल्लीमधील संजय कॉलनी झोपडपट्टी

 

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

#Video : ‘या’ फॉरेनरचा बॉलिवूड गाण्यावरील ‘बोल्ड डान्स’ होतोय प्रचंड व्हायरल

#Video : रिअल लाफफमध्ये खूपच ‘हॉट’ आहे ‘खिलाडी’ अक्षयची ‘ही’ अभिनेत्री, पहा फोटोज, व्हिडीओज