नवीन वर्षात घरी आणा यापैकी 1 तरी वस्तू, ‘सुख-समृध्दी’सह ‘यश’ आणि ‘आर्थिक’ लाभ होईल, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येणाऱ्या नव्या वर्षात जर तुम्हाला घरात सुख-समृद्धी आणि यश हवं असेल तर तुम्हाला तुमच्या घरात अशा काही वस्तू आणाव्या लागतील ज्यामुळे तुम्हाला हे सगळं प्राप्त होईल. हिंदू आणि वास्तू शास्त्रात अशा काही वस्तूंचं वर्णन करण्यात आलं आहे ज्यामुळे तुमच्या सुख-समृद्धी आणि यशात वृद्धी होईल. याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

आर्थिक वृद्धिसाठी ‘हे’ करा

2020 मध्ये घरात जर तुम्हाला आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल किंवा आर्थिक वृद्धी करायची असेल तर तुमच्या घरात धनाची देवता कुबेरची मूर्ती ठेवायला हवी. कुबेरची मूर्ती घरातील पूजेच्या ठिकाणी विधीवत ठेवून त्याची पूजा करायला हवी.

धातूचं कासव किंवा ड्रॅगन आणा घरी

फेंगशुई शास्त्रानुसार, जे लोक घरात धातूचं कासव किंवा ड्रॅगन ठेवतात त्यांच्या घरी पैशांच्या बाबतीत कोणती अडचण येत नाही. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यातून पैशाची कमतरता नष्ट करायची असेल तर येणाऱ्या वर्षात धातूचं कासव, घोडा किंवा ड्रॅगन नक्कीच घरी आणा. यामुळे पैशांची अडचण तर दूर होईलच सोबत तुमच्या आयुष्यात ऊर्जेचा संचारही होईल.

व्यवसायातील भरभराटीसाठी ‘हे’ करा

नोकरीतील वृद्धीसाठी किंवा व्यवसायात फायदा मिळवण्यासाठी 2020 च्या आधी घरात देवी लक्ष्मीच्या पावलांची चिन्हं आणा आणि संकल्प करा की, पूर्ण वर्षभर त्यांची पूजा कराल. याच्या शुभ्र प्रभावानं नोकरी आणि व्यवसायात फायदा मिळेल. तसेच इतर कार्यातही सफलता मिळेल. याशिवाय घरातील उत्तर पूर्व दिशेत लाफींग बुद्धा ठेवल्यानं समृद्धीसह सकारात्मकताही येईल.

वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी ‘हे’ करा
नकारात्मक गोष्टी आणि शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि सर्व अडचणींना दूर करण्यासाठी नवीन वर्षात पंचमुखी हनुमानाची मूर्ती घरी आणा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/