‘झेंडा’ बदलताच मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला ‘सोडचिठ्ठी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईमध्ये महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनादरम्यान मनसेने पक्षाचा झेंडा बदलला आहे. महाअधिवेशन घेऊन मनसेने शक्तीप्रदर्शन करत आपल्या पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. मात्र, मनसेचा झेंडा बदलताच मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी मनसेला रामराम ठोकला आहे.

धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती. त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश केला. तसेच मनसेच्या तिकीटावर धुळ्यातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबईत एकीकडे मनसेचे महाअधिवेशन सुरु असताना नरेंद्र पाटील यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मुंबईतील प्रदेश कार्यालयात अल्पसंख्यांक सेलची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक, समाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार माजिद मेनन उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा –