धर्माबाद बाजार समिती निवडणूकीत आजी-माजी आमदारांचा सक्रिय सहभाग

धर्माबाद : पोलीसनामा ऑनलाईन (माधव मेकेवाड)-धर्माबात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत चांगलीच रंगत आली आहे. तालुक्यातील आजी-माजी आमदारांनी निवडणूकीत सक्रिय सहभाग घेतल्याने हि निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. प्रत्येक आमदार आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असल्याने प्रचाराच्या अंतीम टप्प्यात चांगलीत रंगत भरली आहे. या निवडणूकीच्या प्रचारात आमदार वसंत चव्हाण व माजी आमदार गोरठेकर यांनी आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपसाठी हि निवडणूक प्रतिष्ठेची आहे. शेतकरी गटातील नायगाव ध गटात भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीत जोरदार लढत होण्याची चिन्ह असून कोण विजयी होईल हे सांगणे कठीण आहे. करखेली गटात भाजप, राष्ट्रवादी व अपक्ष उमेदवारात थेट लढत होत आहे. सलेगाव गटात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपात जोरदार चुरस आहे. आटाला गटात भाजप राष्ट्रवादीत लढत होणार आहे. येवती गटात भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये चुरस आहे. आतकुर गटात काँग्रेस, भाजप व अपक्ष यांच्यात चुरस आहे. आलुर गटात भाजप, काँग्रेस व दोन अपक्ष यांच्यात खरी लढत होईल.

चिकना गटात भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये चुरस असून या ठिकाणी जो उमेदवार निवडून येईल तो अल्प मतानेच निवडून येणार आहे. येताला भाजप, राष्ट्वादी व अपक्ष यांच्यात लढत बाळापूर व रत्नाली गटात राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये जोरदार रंगत असून या ठिकाणी अनपेक्षित निकाल लागू शकतो. धानोरा बु गटात भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये जोरदार चुरस आहे. राजापूर गटात काँग्रेस राष्ट्रवादी व भाजपात लढत, जारीकोट गटात भाजप राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये लढत होणार आहे. तर बहुचर्चित असलेली पाटोदा बु गटातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. या व्यापारी गटात तिरंगी लढत होईल इथे दोन अपक्ष व एक काँग्रेसच्या उमेदवार यांच्यात लढत होईल. दगा फटका झाला नाही तर दोन्ही अपक्ष बाजी मारतील यात शंका नाही. हमाल मापडीत अपक्ष उमेदवार येऊ शकतो प्रस्थापितांना धक्का लागू शकतो.

पूर्वी राष्ट्रवादी व भाजपात मुख्य लढत होईल असं चित्र होत. पण आमदाराच्या सक्रिय सहभागाने अनेक ठिकाणी रंगत वाढवली हे नाकारून चालणार नाही. तरी पण भाजप व राष्ट्रवादीचे सर्वाधिक उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस व अपक्ष यांचे हि काही उमेदवार विजयी होण्याचे चिन्ह आहेत. एकंदरीत कुठल्याच पक्ष्याची एकहाती सत्ता येणार नाही निवडणुकीनंतर युती करूनच सभापती निवडला जाईल. कदाचित मुदखेड पॅटर्न होऊ शकतो. अजून दोन दिवसात आजी, माजी आमदार व माजी सभापती काय काय खेळी खेळतात यावर अनेक गटातील चित्र अवलंबून आहे.