गरजूंना पुण्यातील ‘धर्मगर्जना’ प्रतिष्ठानकडून ‘अन्नदान’ !

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या मजुरांना दोन वेळचे अन्न मिळत नाही. त्याचप्रमाणे पुण्यात बाहेरील राज्यातील मजुर देखील अडकून पडले आहेत. तर बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले काही प्रवासी देखील लॉकडाऊनमुळे आपल्या गावी परतू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे खाण्या-पिण्याचे खूप हाल होत आहेत. गरजूंना आणि भुकेल्यांना जेवण मिळावे यासाठी धर्मगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने जेवणाची सोय केली जात आहे. प्रतिष्ठानकडून मागील अनेक दिवसांपासून अन्नदान केले जात आहे.

गरजू आणि भूकेल्यांना जेवण देण्याची जबाबदारी अनेकांनी घेतली आहे. आजचे जेवण पोलीसनामा डॉट कॉमचे संस्थापक आनंद गिल्डा यांच्या मागर्दशना खाली वाटप करण्यात आले .धर्मगर्जना चे संस्थापक अध्यक्ष सागर सैंदाणे हा उपक्रम मागील १६ दिवसापासून राबवित आहेत .यात आज पवन अटक, सुभाष काळे ,विल्सन अल्मेडा , किरण घाडगे (जयनाथ मित्र मंडळ दत्तवाडी) यांनी आपले योगदान दिले. गरजूंसाठी तयार करण्यात आलेले जेवणाचे पॅकेट लायन्स क्लब मित्र मंडळ दत्तवाडी रवी मांडेकर, राजा चौरघे आणि अॅड. संतोष शेटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

धर्मगर्जना प्रितिष्ठनच्या वतीने देण्यात येणाऱ्या जेवणासाठी समाजातील अनेकांनी मदत केली आहे. जयनाथ मित्र मंडळ दत्तवाडी, सामाजिक कार्यकर्ते संतोष बाबर, संग्राम जाधव, अस्मीता फलटणकर-रणदिवे यांनी देणगी स्वरुपात मदत दिली आहे. या सर्वांचे धर्मगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानण्यात आले.

तसेच या उपक्रमामध्ये श्री स्वामी समर्थ मठ दत्तवाडी, बेलदार कुटुंब, केदार मानकर, केदार सुर्वे, आनंद सप्तर्षी, शेखर चौधरी, अनिकेत गायकवाड, सनी घोडे, गौतम कुचेकर, माऊली थोरात, किरण पालकर, शिवप्रताप पाठक, सम्राट कानडे, कुणाल चकने, हितेन झकाटीया यंनी मोलाचे सहकार्य केले.
प्रतिष्ठानच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या अन्नयज्ञासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या दानशूर व्यक्तींना मदत करायची असेल त्यांनी सागर सैंदाने ९८३४१४४८५५, राकेश क्षीरसागर ९७६४७५७५०९ यांच्याशी संपर्क साधावा