Dharmendra | अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात ?; बाॅबी देओल म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dharmendra | अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती नाजूक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असं वृत्त मोठ्या प्रमाणात पसरलं. माध्यामात याबाबतचे वृत्त एकीकडे पसरत आहे आणि दुसरीकडे धर्मेंद्र यांचा मुलगा अभिनेता बाॅबी देओलने (Bobby Deol) मोठा खुलासा करत हा अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. ते एकदम ठिक असून ते सध्या घरी आहेत. असं बॉबी देओलने सांगितलं आहे.

 

अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांना मुंबईच्या ब्रीच कँन्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital, Mumbai) दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. असं वृत्त मोठ्या प्रमाणात पसरलं होतं. यानंतर बॉबी देओलने वडिल अभिनेते धर्मेंद्र यांच्या आरोग्याबाबत माहिती दिली आहे. पसरलेले वृत्त सगळे खोटे असून याबाबत अफवा पसरवली जात आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.

 

या दरम्यान, धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त सोशल मिडियावर प्रसारीत झाल्यानंतर लवकर बरे व्हावेत म्हणत त्यांचे चाहते प्रार्थना करु लागले आहेत. मात्र, धर्मेंद्र यांची तब्येत ठिक म्हणत ते घरात असल्याची माहिती बाॅबी देओलने दिली आहे.

 

 

Web Title :- Dharmendra | dharmendra bobby deol news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा