जुन्या दिवसांची आठवण सांगताना धर्मेंद्र ‘इमोशनल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र आजच्या पिढीतही खूप चर्चेत असतात. अशताच आत त्यांना आपल्या त्या दिवसांची आठवण झाली आहे जेव्हा ते गॅरेजमध्ये रहायचे आणि एका ड्रिलिंग फर्ममध्ये काम करायचे. आपला किस्सा सांगताना ते इमोशनल झाले. इंडियन आयडलच्या 11 व्या सीजमध्ये एका स्पर्धकानं 1976 साली आलेला त्यांचा सुपरहिट सिनेमा चरस मधील गाणं कल की हसीन मुलाकात के लिए या गाण्यावर सादरीकरण केलं. तेव्हा त्यांना आपले जुने दिवस आठवले.

धर्मेंद्र म्हणाले, “सुरुवातीच्या काळात मी एका गॅरेजमध्ये रहायचो. कारण मुंबईत राहण्यासाठी माझ्याकडे घर नव्हतं. माझा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मी एका ड्रिलिंग फर्ममध्ये काम करायचो. तिथे मला 200 रुपये मिळायचे. आणखी पैसै कमावण्यासाठी मी ओवरटाईमही करायचो.” मूळचे पंजाबचे असणारे धर्मेंद्र 70 आणि 80 च्या दशकातील टॉपचे अभिनेते होते.

धर्मेंद्रच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी फूल और पत्थर, अनुपमा, सीता और गीता, शोले अशा अनेक हिट सिनेमात काम केलं आहे. पद्म भूषण विजेता या अभिनेत्यानं घायल आणि यमला पगला दीवाना 2 यांसारखे सिनेमे प्रोड्युस केले आहेत.