काल मोदींजींच्या अंगणात ‘मोर’ आला तर आज माझ्या अंगणात ‘मोरनी’, धर्मेंंद्रनं शेअर केला व्हिडीओ

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – कोरोनाच्या या युगात बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र आजकाल आपल्या फार्म हाऊसमध्ये आरामाचे जीवन जगत आहे. अशा परिस्थितीत कधी कधी धर्मेंद्र आपल्या शेतातील पिकविलेला भाजीपाला धुताना व शेतात ट्रॅक्टरची शेती करताना त्यांचे व्हिडिओ शेअर करत असतात. मंगळवारी धर्मेंद्र यांनी आपल्या फार्म हाऊसचे एक सुंदर दृश्य सोशल मीडियावर शेअर केले, ज्यामध्ये त्यांच्या अंगणात एक मोर दिसला. धर्मेंद्र यांनी याला योगायोगाचा उल्लेख केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: एक दिवस आधी मोराला दाने खाऊ घालण्याचा एक व्हिडिओही शेअर केला होता.

हा व्हिडिओ शेअर करताना धमेंद्र यांनी लिहिले की, “काय योगायोग आहे … काल मोदींच्या अंगणात मोर नाचताना दिसला .. आज माझ्या अंगणात जंगलातून एक मादी मोरनी आली. व्हिडिओ काढू शकलो नाही, ती पळून गेली. आम्ही वाट पाहू..’

दोन दिवसांपूर्वी पीएम मोदींनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ते राष्ट्रीय पक्षी मोराला हाताने दाने खाऊ घालताना दिसत आहेत. इतकेच नाही तर जेव्हा पीएम मोदी मॉर्निंग वॉक करत आहेत, तेव्हा मोर जवळच त्याचे पंख पसरवताना दिसत आहे.

यापूर्वी धर्मेंद्र यांनी आपल्या फार्म हाऊसच्या देसी जीवनाचे अनेक मनोरंजक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.