‘या’ अभिनेत्रीच्या सांगण्यावरून धर्मेंद्र यांनी सोडली होती दारू; फसलात ना, तुम्हाला काय वाटलं हेमा मालिनी

मुंबई, ता. २: पोलीसनामा ऑनलाइन : एका अभिनेत्रीच्या सांंगण्यावरून धर्मेंद्र (dharmendra) यांनी काही वर्षांपूर्वी दारू सोडली होती. पण ही अभिनेत्री हेमा मालिनी नाही तर त्याच काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. या अभिनेत्रीनेच हा किस्सा एका कार्यक्रमात काही महिन्यांपूर्वी सांगितला होता. ‘सुपरस्टार सिंगर’ या कार्यक्रमात आशा पारेख यांनी काही महिन्यांपूर्वी हजेरी लावली होती. त्यावेळी धर्मेंद्र (dharmendra) यांनी व्हिडिओद्वारे त्यांना एक मेसेज दिला होता. त्या व्हिडिओत ते म्हणाले होते की, “आशा पारेख यांचे प्रत्येक अभिनेत्यासोबतचे चित्रपट सुपर डुपर हिट होते आणि मी त्यांना ज्युबिली पारेख म्हणायचो. मग मला तुमच्यासोबत ‘आए दिन बहार के’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.”

धर्मेंद्र पुढे म्हणाले, “आपण तेव्हा दार्जिलिंगमध्ये चित्रीकरण करत होतो. त्यावेळी पॅक-अप केल्यानंतर निर्माते आणि इतर क्रू सदस्य यांच्या पार्ट्या रात्री उशिरापर्यंत रंगत असत. मी देखील त्यात सामील असे आणि मद्यपान करत असे. सकाळी त्याचा वास यायचा आणि तो लपवण्यासाठी मी कांदा खायचो… पण तुम्ही अशी तक्रार करायच्यात की या अभिनेत्याला कांद्याचा वास येतो आणि मला तो आवडत नाही. मी तुम्हाला सांगितले की, मी दारूचा वास लपवण्यासाठी कांदा खातो, तर त्यावर तुम्ही मला दारू सोडायला सांगितले. तुमच्या सांगण्यावरून मी दारू पिणे सोडले आणि त्यामुळे आपल्यात खूप छान मैत्री झाली. आपण जणू एका कुटुंबातले झालो.”

यावर आशा पारेख म्हणाल्या, “आए दिन बहार के चित्रपटात असे एक गाणे आहे, ज्यात धर्मेंद्रजी पाण्यात नाचत आहेत. पण चित्रीकरणाच्यावेळी थंडीमुळे ते हिरवे-निळे पडायचे. प्रत्येकवेळी कट म्हटल्यानंतर ते पाण्याच्या बाहेर यायचे, सर्व जण त्यांना ब्रॅन्डी देण्यासाठी सरसावायचे आणि ते माझ्याकडे पाहायचे… कारण मी त्यांना सांगितले होते की, जर ते दारू प्यायले, तर मी सेटवर येणार नाही किंवा सेट सोडून निघून जाईन. असे २-३ दिवस चालले, पण माझा मान राखून ते दारूला शिवले नाहीत.”

 

Also Read This : 

 

कोण आहे 6 वर्षांची माहिरा इरफान, जिच्या आवाहनावर राज्यपालांनी कमी केली ऑनलाइन क्लासेची वेळ
‘हा’ काढा ठरतोय रामबाण उपाय ! रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, वजनही घटवा; जाणून घ्या

 

 

Gargle Effect On Corona : एका दिवसात किती वेळा गुळण्या कराव्यात, जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

 

Pune : शहर गुन्हे शाखेतील ‘त्या’ पोलिस कर्मचार्‍याचे तडकाफडकी निलंबन, उपायुक्तांनी केली कारवाई

 

संसर्ग नियंत्रित करण्यास नैसर्गिक औषध उपयुक्त; जाणून घ्या