वरुण धवन, कियारा आडवाणी, नीतू कपूर यांना ‘कोरोना’ झाल्याची माहिती ! थांबवण्यात आली सिनेमाची शुटींग

पोलिसनामा ऑनलाइन – जुग जुग जियो (Jug Jug Jeeyo) सिनेमाच्या सेटवरून मोठी बातमी समोर आली आहे. चंदीगढ मध्ये शुटींग करणाऱ्या सिनेमाच्या टीममधील काही खास लोकांना कोरोना झाल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरुण धवन (Varun Dhawan), कियारा आडवाणी (Kiara Advani), नीतू कपूर (Neetu Kapoor) यांना कोरोनाची लागण झाली आहे. परंतु अद्याप मेकर्स किंवा खुद्द स्टार्सनी याची पुष्टी केलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, कलाकारांना कोरोना झाल्यानंतर सिनेमाची शुटींग थांबवण्यात आली आहे.

एका हिंदी वृत्तपत्राच्या वेबसाईटनंही याबाबत वृत्त दिलं आहे. सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं जात आहे की कोरोना रिपोर्ट आल्यांतर सिनेमाची शुटींग थांबवली गेली. सूत्रांच्या मते गुरुवारी ही माहिती समोर आली आहे आणि यानंतर शुटींग थांबवली गेली आहे. लवकरच या प्ररकणी अधिकृत माहिती समोर येऊ शकते.

अलीकडेच भाजप खासदार अभिनेता सनी देओल याला (Sunny Deol) मनालीत व्हॅकेशन एन्जॉय करताना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. सध्या त आयसोलेशनमध्ये आहे.