पुणे : Dhayari Pune Crime News | दारु पिल्यानंतर जेवण करताना ताटात हात घालून का खातो, या कारणावरुन झालेल्या वादातून तरुणाचा लाकडी बांबु, दगडाने मारहाण करुन खून केला. आदित्य घोरपडे (वय २१, रा. धायरी फाटा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिंहगड रोड पोलिसांनी आकाश ऊर्फ नन्या परदेशी, त्याचा सावत्र भाऊ सुरेश शुक्ला व तीन मित्रांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Murder In Dhayari Pune)
याबाबत आदित्य याची आई राजश्री संतोष घोरपडे (वय ४३, रा. घोरपडे चाळ, गारमाळ, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. खुनाचा प्रकार धायरी रोडवरील लाडली साडी सेंटरजवळील त्रिमुर्ती किराणा दुकानासमोर पहाटे सव्वा वाजता घडला.
याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर (PI Raghvendrasingh Kshirsagar) त्यांनी सांगितले की, आदित्य घोरपडे व त्याचे मित्र नर्हे येथील गॅलक्सी रेस्टो बार येथे दारु पित बसले होते. दारु पिल्यानंतर त्यांनी जेवण मागविले. ते जेवण करीत असताना आकाश हा आदित्य याच्या ताटात हात घालून खाऊ लागला. तेव्हा आदित्य याला ते किळसवाणे वाटले. त्याने माझ्या ताटातील घेऊन कशाला खातो, असा जाब विचारला.
दारुच्या नशेत असल्याने त्यांच्यात वाद झाला. तेव्हा आकाश निघून गेला.
आदित्य व त्याचे मित्रही जेवण झाल्यावर घरी जात होते.
मध्यरात्री १ वाजून १५ मिनिटांनी आकाश व त्याच्या मित्रांनी वाटेत आदित्यला गाठले.
त्याला लाकडी बांबु व दगडाने मारहाण केली. जबर जखमी झालेल्या आदित्यचा मृत्यु झाला.
ही घटना समजताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam), अमोल झेंडे (DCP Amol Zende), निखिल पिंगळे (DCP Nikhil Pingle), सहायक पोलीस आयुक्त अजय परमार (ACP Ajay Parmar), साईनाथ ठोंबरे (ACP Sainath Thombre) , वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, गुन्हे निरीक्षक अतुल भोस (PI Atul Bhos) व इतर अधिकार्यांनी घटनास्थळाला भेट दिली. आदित्यला मारल्यानंतर सर्व जण पळून गेले असून गुन्हे निरीक्षक अतुल भोस अधिक तपास करीत आहेत. (Dhayari Pune Crime News)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa