Dheeraj Ghate | निष्क्रिय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घरी पाठवा – धीरज घाटे

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Dheeraj Ghate | पुण्यामध्ये पहिल्या पावसात संपूर्ण पुणे शहरात पाणीच पाणी झाल्याचे चित्र दिसून आले नालेसफाई आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागात झालेली दिरंगाई यावरून क्षेत्रीय कार्यालयात पुरेशी साधन सामग्रीची कमतरता यामुळे पुणेकर पहिल्याच पावसात त्रस्त झाले होते याच पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने आज शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वात महानगरपालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale) यांची भेट घेऊन निवेदन दिले.(Dheeraj Ghate)

या वेळी बोलताना घाटे म्हणाले की ‘भाजप च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत आयुक्तांना भेटलो. निवडणुकी नंतर देखील भेटून पावसाळा तयारीचा आढावा घेतला होता व सूचना दिल्या. परंतु शनिवारी अनेक भागात रस्त्यांवर गुडघाभर पाणी होते.

क्षेत्रीय कार्यालायतील अधिकारी, कर्मचारी फिल्डवर दिसत नाहीत. लोकप्रतिनिधी कार्यकर्ते घटनास्थळी असतात.
अधिकारी असले तरी त्यांच्याकडे यंत्रसामुग्री नसते, उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. याचा पालिकेने विचार करावा.
शासनाचे अधिकारी आहेत. त्यांना शहराची माहिती नसते. याचा परिणाम होतोय.
त्यामुळे अशा निष्क्रिय अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करून घरी पाठवा. लवकरच संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्यापालख्या पुण्यात येत आहे. महानगरपालिकेची यंत्रणा लावण्यास .सुरुवात करावी , शाळा मध्ये सर्व प्रकारे तयारी करावी अशी मागणी केली.

आपत्ती व्यवस्थापन विभागात उपयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक रात्रपाळी साठी करावी अशीही मागणी शिष्टमंडळाने
य वेळी केली
या शिष्टमंडळात शहराध्यक्ष धीरज घाटे ,आमदार भीमराव तापकीर, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, सुशील मेंगडे,
प्रसन्न जगताप अजय खेडेकर राजेश येनपुरे,सरचिटणीस राजेंद्र शिळीमकर, रवींद्र साळेगावकर ,राहुल भंडारे ,
राघवेंद्र मानकर वर्षा तापकीर सुभाष जंगले राजेंद्र काकडे अर्जुन जगताप सचिन बालवडकर पुष्कर तुळजापूरकर
यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : कोयत्याने वार करत दगड, सिमेंटच्या गट्टूने ठेचून ताडी विक्रेत्याचा निर्घृण खून, तळवडे रोडवरील थरार

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : फोटो मॉर्फ करुन खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक, पोलिसांकडून कोलकाता येथील कॉल सेंटर उध्वस्त; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

Raj Thackeray | बिनशर्त पाठिंबा तरी राज ठाकरेंना शपथविधीचे आमंत्रण का नाही? भाजपाकडून डॅमेज कंट्रोल सुरू?

Supriya Sule | पुण्यातील नालेसफाईच्या कामाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची सुप्रिया सुळे यांची मागणी